आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलट प्रशिक्षण:हेलिकॉफ्टर पायलट प्रशिक्षण, 10 वी - 12 वी उत्तीर्णांना संधी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरी उड्डयन मंत्रालयाने जळगावात विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या घाेषणेनंतर प्रशिक्षण कंपन्या व विमान प्राधिकरण यांच्यात करार झालेला आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावर खासगी व व्यावयासिक वैमानिक प्रशिक्षण केंद्रास दोन महिन्यांपासून सुरुवात झाली. सध्या सहा विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. राज्यातील दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

नागरी उड्डयन मंत्रालयाने (डीजीसीए) विमान प्रशिक्षण केंद्र मंजूर केल्यानंतर विमानतळ प्राधिकरण कुठलेही व्यावसायिक शुल्क न आकारता २५ वर्षांसाठी विमानतळावरील सर्व सुविधा वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एका वर्षाचा लेखी व प्रात्याक्षिक असा अभ्यासक्रम राहणार आहे. अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी नागरी उड्डयन मंत्रालय, हवामान विभाग, विमान प्राधिकरण, केंद्रीय गृह मंत्रालय, सुरक्षा विभाग, महावितरण, प्रदूषण नियंत्रण या विभागांकडून ना हरकत घेण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता अशी
वैमानिक परवाना हा वैयक्तिकसाठी (पीपीएल- प्रायव्हेट पायलट परमीट) दहावी उत्तीर्ण असे आवश्यक आहे. व्यावसायिक वैमानिक परवानासाठी (सीपीएल- कर्मशियल पायलट परमीट) बारावीत फिजिक्स, मॅथ्स व केमिस्ट्री या तीन विषयांसह उत्तीर्ण हाेणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी भारतभरातून कोणीही विद्यार्थी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतो.

एका वर्षाला २०० तासांचे उड्डाण
वैयक्तिक व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांचा कोर्स एका वर्षाचा राहणार आहे. या एका वर्षात व्यावसायिक कोर्सच्या विद्यार्थ्यांना वर्षाला २०० तासांचे उड्डाण करू दिले जाईल. यात १८५ तास सिंगल इंजिन व १५ तासांचे मल्टी इंजिन उड्डाण मिळणार आहे. वैयक्तिक वैमानिक कोर्सला ५० तासांचे उड्डाण दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...