आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय महामार्गावरील चालत्या मालट्रकमधून केबलची चोरी करणाऱ्या चार चोरट्यांच्या टोळीला मंद्रूप पोलिसांनी अटक केली. या चारही संशयितांकडून दोन लाख ८८ हजार १८० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्ह्यात वापरलेली एक लाख ६५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली व एक अॅटो रिक्षा जप्त केली. एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अंबादास नामदेव कुंभार (वय २७,रा. औज (मं), ता. दक्षिण सोलापूर), सतीश वैजिनाथ माने (वय ३४, रा. सैफुल, सोलापूर), अमोल कट्याप्पा गायकवाड, (वय २८, रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर) व सोमनाथ यशवंत भालेराव (वय २९, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांना मुद्देमालासह अटक केली. तेलंगवाडी (ता. मोहोळ) ते नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) या दरम्यान १३ डिसेंबर रोजी रात्री मालट्रक आडवून चोरीचा प्रकार घडला होता.
याप्रकरणी बबन माणिकराव गवई (रा.सावखेडा भुई, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी मंद्रूप पोलिसात फिर्याद दिली होती. गवई यांच्या ट्रकमधून ६ लाख ८३ हजार ४९८ रुपयांच्या केबल वायरची चोरी झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार संदीप काशीद, पोलिस शिपाई संदीप काळे, दिनेश पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
रात्री ट्रक चालकांनी खबरदारी घ्यावी
कामती ते मंद्रूप या महामार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करताना ट्रक चालकांनी अज्ञात वाहन अथवा व्यक्ती दिसल्यास वाहन थांबवू नये. खबरदारी घेऊन वाहन चालवावे. काही संशयास्पद घटना घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. ट्रक मधून चोरी करणाऱ्या वरील चारही आरोपींची कसून चौकशी करीत आहोत. यापूर्वी त्यांचा कोणत्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास गुन्हा दाखल होईल.’’- रवींद्र मांजरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.