आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Hindus Demand Hindu Rashtra Through Indian Constitution For Their Own Existence; Khadye's Appeal In Hindu Rashtra Jagruti Sabha |marathi News

आवाहन:हिंदूंनो स्वत:च्या अस्तित्वासाठी भारतीय संविधानाद्वारे हिंदू राष्ट्राची मागणी करा; हिंदू राष्ट्र जागृती सभेत खाड्ये यांचे आवाहन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू बहुसंख्याक भारतात कमलेश तिवारी, हर्ष, किशन भारवाड श्रीनिवासन आदी हिंदू नेत्यांच्या दिवसाढवळ्या हत्या केल्या गेल्या. श्रीराम नवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढल्या गेलेल्या शोभायात्रांवर पूर्वनियोजित हल्ले करून दंगली घडवण्यात आल्या. आज ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्याक बनले आहेत. त्यामुळे हिंदूंनो, स्वत:च्या अस्तित्वासाठी ‘भारतीय संविधानाद्वारे हिंदू राष्ट्रा’ची मागणी करा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाड्ये यांनी केले.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापुरात भवानी पेठेतील अथर्व गार्डन या ठिकाणी ‘हिंदू राष्ट्र जागृती’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. महिलांवरील वाढते अत्याचार पाहता ते रोखण्यासाठी समितीच्या वतीने धर्म शिक्षण वर्ग आणि स्वरक्षणासाठी ‘स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग’ घेण्यात येतात. त्यामध्ये अवश्य सहभागी व्हा, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या अलका व्हनमारे यांनी केले. सभेत हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांचेही भाषण झाले. विविध संघटनांसह नागरिक मोठ्या संख्येने उप‍स्थित होते. प्रारंभी शंखनाद करून खाड्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहितांनी वेदमंत्र पठण केले. समितीच्या कार्याचा आढावा दत्तात्रय पिसे यांनी मांडला. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. आभार वर्षा जेवळे आणि ऋतुराज अरसिद यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...