आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अतिसंवेदनशील गाव म्हणुन निवडणुकीत ओळख असलेल्या माढा पोलिस स्टेशन हद्दीतील सापटणे(भोसे)गावची ग्रामपंचायतची निवडणूक यंदा बिनविरोध झाली आहे. गावातील स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा निर्धार केला. त्यानुसार यास उपस्थित ग्रामस्थांनी देखील प्रतिसाद दिला. आता बिनविरोध निवडणूक झाल्याची 4 जानेवारी रोजी प्रशासनाची औपचारिकता केवळ उरली आहे.
नेते मंडळी अन् ग्रामस्थांमध्ये सामोपचाराने समन्वय साधला गेल्याने गाव बिनविरोध झाले आहे. या गावात दर निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे या राष्ट्रवादीच्या आमदार बंधुचे समर्थक असलेल्या हनुमंत गिड्डे, संग्राम गिड्डे या दोघा बंधुमध्ये राजकीय युध्द होत असायचे.
दोन्ही नेत्यांनी आपाआपल्या गटातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार मांडला. त्यास कार्यकर्त्यांनी देखील होकार दर्शवला. ग्रामस्थांनी तर मोठ्या उत्साहाने हा निर्णयाला प्रतिसाद दिला. माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांनी देखील गावात जाऊन नेते मंडळी, ग्रामस्थांचे बिनविरोध निवडणुकी संदर्भात प्रबोधन केले होते.
यापूर्वी, जवळपास अडीच हजार लोकसंख्या अणि 1850 मतदार असलेल्या या गावात लाखो रुपयांचा चुराडा होऊन निवडणुक पार पडत असायची. यातुन शाब्दिक बाचाबाची, राजकीय वितुष्ट निर्माण होत असायची. यंदा मात्र या गोष्टीला फाटा बसणार असून गावात शांतता व सुव्यवस्था राखली जाईल. ग्रामपंचायत निवडणुकीत काटे की टक्कर होणाऱ्या या गावात यंदा निवडणुक होणार नसल्याने ग्रामस्थ देखील आनंदून गेले आहेत.
निवडणूक बिनविरोध झाल्याचा आनंद तहसील कार्यालया बाहेर नेते मंडळी, उमेदवार व ग्रामस्थांनी पेढे वाटून साजरा केला. यावेळी हनुमंत गिड्डे, संग्राम गिड्डे, कुस्ती सम्राट अस्लम काझी, युवराज राऊत,बिभीषण राऊत,बबन पाटील,धर्मराज पाटील,माऊली गायकवाड,किसन राऊत,बाबुराव ओहोळ यांचेसह दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे आहेत 9 बिनविरोध सदस्य- बालाजी गणपत गिड्डे, राजेंद्र भारत भालेराव,रोहिणी किसन राऊत, बालाजी अनिल अवचर,अनिता शंकर मुसळे,स्वाती हनुमंत गिड्डे,बाळू निवृत्ती माळी,दिपाली सखाहारी गिड्डे,जयश्री तानाजी गोरे.
निवडणुकामुळे वाद तंटे व्हायचे. किरकोळ कारणामुळे वातावरण गढुळ होत होते.यंदा कोरोना चे संकट आणी गावचा सर्वागीण विकास होणे यामध्येच सर्वाचे हित असणार असुन गावात शांतता नांदेल.-हनुमंत गिड्डे,माजी सरपंच सापटणे(भोसे)
निवडणुकीच्या कालावधीत किरकोळ कारणावरून भांडणे होत असायची.यामुळे गावची प्रतिमा मलिन होत होती.गावातले अनेक जण भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.गावच्या विकासासाठी दोन्ही पार्टीच्या लोकांनी एकत्र येऊन गावच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतला.-संग्राम गिड्डे,सापटणे(भोसे)ता.माढा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.