आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रामाणिकपणा:माढ्यातील हॉटेल कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये सापडलेली 50 हजारांची सोन्याची अंगठी केली परत

संदीप शिंदे | माढा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मतलबी युगात प्रामाणिकपणा क्वचितच पहायला मिळतो. अशाच एका प्रामाणिकपणाचे दर्शन माढ्यातील हॉटेल कर्मचाऱ्याने दाखवुन दिले आहे. हॉटेल अभिराज मधील सचिन जाधव याने सापडलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी (50 हजार रुपये किंमत) विवेक जबडे या ग्राहकाला परत दिली आहे.

माढ्यातील विवेक भारत जबडे हे शहरातील हॉटेल अभिराज मध्ये मित्र परिवारासोबत शनिवारी सायंकाळी जेवायला गेले होते. शनिवारी सायंकाळी गेले होते. जेवण आटपून हॉटेल मधुन घरी गेल्यानंतर जबडे यांना बोटातील सोन्याची अंगठी दिसून आली नाही. त्यांनी घरात शोधाशोध केली मात्र ती काही सापडली नाही. हॉटेल मध्ये जाऊन विचारपूस केली असता तेव्हा हॉटेल मालक सचिन चवरे, सोमनाथ चवरे यांनी अंगठी सचिन जाधव या कामगारास सापडली असल्याचे सांगितले. ओळख अन् खातर जमा केल्यानंतर कर्मचारी कर्मचारी जाधव यांच्या हस्ते जबडे यांच्याकडे अंगठी स्वाधीन करण्यात आली. जाधव यांच्या प्रामाणिकपणा बद्द्ल जबडे यांनी मित्र परिवाराच्या हस्ते सन्मान करुन कौतुक देखील केले. यावेळी सचिन चवरे, सोमनाथ चवरे, राहुल कांबळे, रत्नदीप लटके, शरद वारगड, मंगेश गाडेकर, भारत भाकरे आदी उपस्थित होते.

आजच्या कलियुगात सारं काही विकत घेता येत म्हणतात. पैशाने वस्तु विकत घेता मात्र सद्गुण घेता येत नाही. आणि या सद्गुणांना सोबत घेऊन जगणारी माणसं जरी दुर्मिळ होत चालली असली तरी अशा माणसांच्या चांगुलपणाचे ज्या ज्या वेळी दर्शन घडते तेव्हा सारा समाज आपसुकच सलाम करतो.

अंगठी बेसिनच्या कोपर्‍यात

सचिन जाधव हे विवेक जबडे यांचा टेबल पाहत होते. जेवण आटपुन गेल्यानंतर जाधव हे टेबल व खोली साफ करत असताना त्यांना बेसिनच्या कोपर्‍यात अंगठी दिसुन आली.ति घेऊन हॉटेल मालकाना याची कल्पना दिली. जबडे येताच जाधव यांनी ओळख पटवून अंगठी त्यांना परत केली.

> तीन वर्षापासुन मी हाॅटेल मध्ये काम करतो आहे. यापुर्वी देखील मला मोबाईल, रोख पैसे सापडले होते.मी जेवण करुन गेलेल्या ग्राहकांना परत केलेत. कष्ट करुन कमावलेल्या पैशाचा आनंद वेगळाच असतो. कष्टाचा पैसा धोका देत नाही. - सचिन जाधव, हॉटेल कर्मचारी माढा

> हॉटेल मधील कर्मचाऱ्याना पगार कमी असतात. सध्या क्वचितच प्रामाणिकपणा पहायला मिळतो. मात्र हॉटेल कर्मचाऱ्याने माझी सोन्याची हरवलेली अंगठी परत दिली.त्याचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद असंच आहे. - विवेक जबडे, हॉटेल ग्राहक

> सध्याच्या युगात प्रामाणिक पणा क्वचितच दिसतो.सचिन ने दाखवलेल्या प्रामाणिक पणाचा अन् आमच्या या कर्मचाऱ्याचा सार्थ अभिमान वाटतो - सोमनाथ चवरे, मालक हॉटेल अभिराज

बातम्या आणखी आहेत...