आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:बदली झालेल्या न्यायाधीशांचा सत्कार; बार असोसिएशनतर्फे आयोजन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदली झालेल्या जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांचा सत्कार बार असोसिएशनतर्फे करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश ठोकडे, बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांची उपस्थिती होती. सर्वांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन अलका मोरे यांनी केले. आभार चंद्रसेन गायकवाड यांनी मानले. यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी, वरिष्ठ वकील उपस्थित होते. न्यायाधीश यू. एल. जोशी, एस. एस. जगताप, के. पी. जैन, के. के. पाटील, बी.डी. पंडित, एस.आर. मोकाशी, एस. एस. पाटील, एम. आर. देवकते, एम. एम. बाबरे, श्रीमती राठोड, एम. व्ही. किरमे, बी. व्ही. चव्हाण, श्रीमती तापडीया, आर. ए. मिसाळ या न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...