आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजातील तळागाळातील लोकांशी एकरूप होऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना ही कायम तत्पर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणींविषयी विद्यार्थी सेना किंवा युवती सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्क करावा त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम पाठपुरावा राहील, असे प्रतिपादन युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे यांनी केले.
मोहोळ शहर व तालुका विद्यार्थी सेनेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख, शिवसहकार सेनेचे जिल्हा संघटक नागेश वनकळसे,उपजिल्हाप्रमुख सुरज जम्मा,युवतीसेनेच्या उपजिल्हाप्रमुख ज्योती पुजारी, तालुकाप्रमुख अमृता उन्हाळे,उपशहर प्रमुख दीपिका सामंत, शहरप्रमुख व आयोजक तेजस माळवदकर,प्रशांत होनमाने,तालुकाप्रमुख दादाराज बेलदार, अविनाश क्षीरसागर, स्वप्नील देशमुख, निखिल वजीरनाथ, विजय महाडिक, गणेश शेंडगे,समाधान वाघमोडे, विजय गायकवाड,वैभव चव्हाण,साहिल शेख, सुशील देशमुख, बालाजी कुर्रे,महेश कणके,भारत कणसे,प्रसाद देशमुख,रोहन खुळे आदिंसह विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख देशमुख म्हणाले, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम सुरू असून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरती काम सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर भविष्यात उज्ज्वल यश मिळविण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहनही यावेळी देशमुख यांनी बोलताना केले. विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.