आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन:गुरव समाजातर्फे आज महिलांचा सन्मान‎

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त‎ राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर‎ जिल्हाच्या वतीने बुधवारी विविध पुरस्कार‎ देण्यात येणार आहेत. रंगभवन येथील‎ समाजकल्याण केंद्रात पुरस्कार वितरण‎ होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.‎ मनीषा घोंगडे हे उपस्थित राहणार आहेत.‎ वृषाली गुरव-आरोग्य, दीपाली‎ बोरमाणीकर गुरव-पोलिस सेवा, आशा‎ नळेगावकर -ब्युटीशियन, सायली पाटील-‎ मुख्याध्यापिका, वंदना तळीखेडे-आदर्श‎ माता, मनीषा गुरव -आदर्श शिक्षिका,‎ कांचन चौघुले -उद्योजिका , गीता‎ क्षीरसागर -लघु उद्योजिका, तृप्ती चराटे-‎ प्रशासकीय अधिकारी, वैशाली मेलगिरी -‎ गुणवंत शिक्षक, संगीता गुरव-आदर्श‎ आरोग्य सेवा यांना सन्मानित करण्यात‎ येणार आहे.‎

यावेळी राष्ट्रीय गुरव समाज महासंघ‎ महासचिव मल्लिकार्जुन गुरव, राष्ट्रीय‎ कार्यकिरणी सदस्य, शशिकांत जिडीमनी,‎ शहर महिला अध्यक्ष वैशाली मेलगिरी,वर्षा‎ पाथरकर सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष,‎ जिल्हा गुरव समाज अध्यक्ष श्री निंगराज‎ विंचुरे, सचिव गंगाधर पुजारी, खजिनदार‎ सुरेश पाटील, संतोष पुजारी,महादेव‎ चिंचोळे, शिक्षक श्री बिराजदार हे उपस्थित‎ राहणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...