आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; उपजिल्हाप्रमुख ज्योती पुजारी उपस्थित

मोहोळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील तळागाळातील लोकांशी एकरूप होऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना ही कायम तत्पर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणींविषयी विद्यार्थी सेना किंवा युवती सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्क करावा त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम पाठपुरावा राहील, असे प्रतिपादन युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे यांनी केले.

विद्यार्थी सेनेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख, नागेश वनकळसे, उपजिल्हाप्रमुख सुरज जम्मा,युवतीसेनेच्या उपजिल्हाप्रमुख ज्योती पुजारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...