आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलांची मिरवणूक:बैलांच्या मिरवणुकीपुढे मंद्रूप येथे घोड्यांचा नाच; सर्वच गावांमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा सण शेतकऱ्यांना साजरा करता आला नाही. यावेळी मात्र सर्वच गावांमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. मंद्रूपमध्ये बाजार चौकातून दुपारी तीन नंतर मुख्य रस्त्याने बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

मेंडगुदले व शेंडगे या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या समोर मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील सोन्या व हिरा या घोड्यांना मिरवणुकीत आणले होते. हलगीच्या तालावर नाचणाऱ्या या दोन्ही घोड्यांचा नाच पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याशिवाय इतर शेतकऱ्यांचेही बैलांच्या जोडी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. गाव तलावातून बैलांची जोडी परत वेशीत आल्या. येथे गावचे देशमुख घराण्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी हनुमान मंदिरजवळ कर तोडल्यानंतर साडेसात वाजता बैलांच्या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. याशिवाय कंदलगाव, भंडारकवठे, कुंभारी, होटगी वळसंग आदी भागात बैलांची मिरवणूक उत्साहात निघाली.

बातम्या आणखी आहेत...