आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचकट निकष:हॉटेल्सना औद्योगिक दर्जा,पर्यटन विकास साधणार

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटन संचालनालयातर्फे महाराष्ट्रातील हॉटेल्सना औद्योगिक दर्जा देण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. पुणे विभागातील १८१ ‘अ’ वर्गीकृत हॉटेल्सनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सोलापुरातील फक्त सात हॉटेलचा समावेश आहे. नोंदणीसाठी वर्गवारी अन् नियम, निकष खूप किचकट आहे. त्याऐवजी हॉटेल्सची सरसकट नोंदणी करून घेतल्यास पर्यटनासह, शहराचा दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा हॉटेल असोसिएशनची आहे.

राज्य शासनाने एप्रिल १९९९ मध्ये आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा दिला होता. पण, तो निर्णय फक्त केवळ कागदोपत्री राहिल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती. सन २०२० मध्ये राज्य शासनाने ‘अ’वर्गीकृत हॉटेल्ससाठी औद्योगिक दराने कर आणि शुल्क आकारण्याचे निकष जाहीर केले. अ-वर्गीकृत हॉटेल्सना नोंदणी करून लाभ तर बिलांमध्ये वाढ हाेईल पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हॉटेलची वर्गवारीचे निकष रद्द झाल्यास पुणे, मुंबईच्या तुलनेत सोलापूर सारख्या छोट्या शहरास त्याचा लाभ होईल. सोलापूर हॉटेल असोसिएशनमध्ये फक्त मालकांचा समावेश असून, ११० सभासद आहेत. जिल्ह्यातील हॉटेलची संख्या मोठी आहे. वाणिज्य दरानुसार आम्ही कर भरतो. पण औद्योगिक सवलतींसाठी वर्गवारीमुळे हॉटेलचा समावेश होईल. छोट्या हॉटेल ना औद्योगिक सवलतींच्या निकषांसाठी करावी लागणारी गुंतवणूक परवडणारी नाही. तसेच ग्राहकांच्या बिलांमध्ये वाढ होईल. उदय भागवत, सचिव, सोलापूर हॉटेल असोसिएशन

राज्यात ४४६ अर्ज दाखल राज्यात ४४६ अर्ज पर्यटन संचालनालयाकडे दाखल झालेत. सर्व निकषांची पूर्तता केल्यास औद्योगिक दर्जा मिळण्यास पात्र असतील. इच्छुक हॉटेल व्यावसायिकांनी महाराष्ट्र पर्यटनाच्या https://www.maharashtratourism.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करावा. सुप्रिया करमरकर, उपसंचालक, पर्यटन विभाग पुणे,

घेण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. कशी असेल तपासणी समिती? तपासणी समितीच्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक, अन्न व औषध प्रशासनाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक प्रतिनिधी, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे स्थानिक प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर असोसिएशनचे प्रतिनिधी, अर्जदार हॉटेल्सची पाहणी करतील. क्वालस्टार या एजन्सीने स्थळांची पाहणी करण्यासाठी नियोजन आराखडा तयार केला आहे ज्याचे पालन करणे समितीसाठी बंधनकारक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...