आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांची मागणी वाढली:श्रावणात घरोघरी सण पूजा-परंपरा ; रोज दोन हजार टन फुलांची आवक

साेलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सध्या रोज दोन हजार टनांहून अधिक फुलंाची आवक हाेत आहे. रतलाम, साधे गुलाब, पिंक गुलाब, काकडा शेवंती, निशिगंध, गुलबक्षी अशी अनेक फुलं सोलापूरकरांना प्रिय असून याची मागणी जोरदार आहे. होलसेलमध्ये फुलांच्या खरेदीसाठी पहाटेच मार्केट यार्डात धाव घेत आहेत. दुपटीने फुलांची मागणी वाढली आहे.

सोलापुरात पहाटेपासून फुलांची आवक सुरू होते. यात दीड हजार टन केवळ वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाचा समावेश आहे. यात लाल गुलाब जोमात विकला जातो. तर काकडाझ निशिगंध, रतलाम गुलाब, भाग्यश्री शेवंती आणि इतर छोट्या प्रकारच्या फुलांनाही बाजारात मागणी पाहायला मिळते आहे. तर इंग्लिश गुलाब या वेगळ्या प्रकारच्या गुलाबाची मागणी बुके व इतर वेगवेगळ्या सजावटीच्या कार्यक्रमासाठी डेकोरेशनसाठी केली जाते. अशा फुलांच्या पेट्यांनाही मागणी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जवळपास ६० टक्क्यांहून अधिक फुले येतात. याशिवाय उस्मानाबाद, तुळजापूर आणि कर्नाटकच्याही काही गावांतून फुलं येतात.

केळीच्या पानालाही वाढती मागणी
सध्या केळीच्या पानावर जेवणाची पंगत वाढायची क्रेझ सुरू आहे. याला अनेकांची मागणी असून केळीच्या पानाला मोठ्या प्रमाणावर बाजारात मागणी होत आहे. मधला मारुती भागात मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांची विक्री हाेते. या पंगत पध्दतीला सोलापूरकरांची पसंती मिळत आहे.

दिवाळीपर्यंत असते मागणी
श्रावण महिन्यापासून हिंदू सणांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. त्यामुळे फुलांची मागणी वाढते. दिवाळीपर्यंत मागणी असते. काेराेनानंतर दाेन वर्षांनी बाजारापेठेत उत्साह आहे. त्यामुळे मागणी अधिक आहे.
संजय लोखंडे, फुलांचे ठोक व्यापारी

असे आहेत फुलांचे प्रतिकिलो भाव
तांबा गुलाब - ८०
रतलाम गुलाब- ७०
पिंक गुलाब- ६०
इंग्लिश गुलाब- १० रुपये गठ्ठा
शेवंती- १२० किलो
काकडा- ३५०-
निशिगंध- ६०

बातम्या आणखी आहेत...