आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीची समस्या:24 तासांत येणारी दोन हजारांवर वाहने‎ रात्री 10 तासांत शहर ओलांडणार ‎कशी‎

म. युसूफ शेख | सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने सकाळी सात ते‎ रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक शहरातून बंद केली आहे.‎ रात्रीच्या दहा तासांत सुमारे दोन हजार जड वाहने शहरातून जाणार‎ आहेत. त्यामुळे रात्री वाहतुकीची समस्या निर्माण होईल, याविषयी‎ विचारले असता वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सांगितले‎ की, प्रमुख चौकात रात्री वाहतूक पोलिस नेमण्यात येतील.‎

हैदराबाद, पुणे, तुळजापूर, सांगली, विजापूर, अक्कलकोट या‎ सहा राष्ट्रीय महामार्गवरील टोल नाक्यावरून दररोज ३०३१‎ जडवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. त्यापैकी दोन हजार‎ वाहने शहरातून जात असल्याचा अंदाज आहे. या दोन हजार‎ वाहनांना रात्रीच्या १० तासांत शहर पार करावे लागणार आहे.‎

रात्री नऊनंतर जड वाहतूक‎
शहरात रात्री नऊनंतर जड वाहतूक‎ साेडली जाईल. जोपर्यंत वाहतूक‎ सुरळीत होत नाही तोपर्यंत पोलिस‎ कर्मचारी कर्तव्य बजावतील. शहरात‎ जडवाहतुकीचे दहा पॉइंट निश्चित‎ केले आहेत. त्या सर्व ठिकाणी‎ वाहतूक पोलिस हजर असतील.‎ वाहतूक सुरळीत होईल.”‎ -विश्वनाथ सिद, पोलिस निरीक्षक‎ वाहतूक शाखा‎

आयुक्तांना भेटले‎‎
विविध वाहतूक संघटनेच्या‎ पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी‎ सायंकाळी पोलिस‎ आयुक्त राजेंद्र माने यांची‎ भेट घेऊन निवेदन दिले.‎ पूर्वीप्रमाणे जड वाहतूक‎ सुरू ठेवावी, अशी मागणी‎ करण्यात आली. यावेळी‎ अनेक वाहतूक संघटनेचे‎ पदाधिकारी व कार्यकर्ते‎ उपस्थित होते.‎

जड वाहनांना दुपारी मुभा द्या‎
‎शहरात पूर्वी दुपारी‎ ‎ एक ते चार या वेळेत‎ ‎ जड वाहतूक सोडली‎ ‎ जायची. त्याप्रमाणे‎ ‎ जड वाहतूक‎ ‎ सोडावी. अन्यथा‎ रोजगार, व्यवसायावर परिणाम होईल.‎ प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन‎ निर्णय घेणे अपेक्षित होते. आता अंतिम‎ निर्णय त्या पद्धतीने घ्यावा.’’‎- केतन शहा, व्यापारी‎

बातम्या आणखी आहेत...