आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य व राष्ट्रीय खेळाडूंची पाया भरणी ही शालेय मैदानापासून होते. तसेच, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्याने मैदानी खेळ खेळणे आवश्यक असतेे. पण वाढते शहरीकरण व जागेच्या अभावी शाळांचे मैदान आता इतिहास जमा होताना दिसत आहे. त्यामुळे मुले मैदान मारणार कशी, असा प्रश्न उभा ठाकलेला दिसतोय. शाळांना मैदानेच नसतील तर मान्यता कशा दिल्या, हा प्रश्न उपस्थित होतो . जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या मिळून पहिली ते बारावीच्या ४ हजार ७४० शाळा आहेत. त्यापैकी १२५ शाळांना मैदानच नाही. त्यात शहरातील ५१ शाळांचा समावेश आहे. शहरातील शाळा मुलांना विविध क्रीडा किंवा खेळाच्या तासाला इतर किंवा शासकीय मैदानावर घेऊन जातात. काही शाळा क्रीडा प्रकार शिकतोय म्हणून पालकांकडून शुल्कही वसूल करतात. प्रत्यक्षात क्रीडा तासाला मुलांना संगणक किंवा इतर ऑनलाइन द्वारे शिक्षण देण्यावर भर देतात. विद्यार्थ्यांत शारीरिक शिक्षण व खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळांना मैदाने असणे आवश्यक आहे. शाळेच्या मान्यतेसाठी मैदानासह इतर अकरा निकषांची पूर्तता करावी लागते. परंतु प्रशासनाने याकडे डोळेझाक करत मान्यता दिल्याचे दिसते. शाळांच्या वेळापत्रकात आठवड्यात दोन ते चार तास खेळाचे असतात, पण अनेक शाळांना मैदानच नसल्याने खेळायचे कुठे, असा प्रश्न मुलांना पडतो.
नियम काय सांगतो ‘आरटीई’ कायद्यांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांना ११ निकषांची पाहणी करुन मान्यता देण्यात येते. त्यात क्रीडांगण, मुख्याध्यापकांचे कार्यालय, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रंथालय, अध्ययन व अध्यापन साहित्य, शाळेला कुंपण, स्वयंपाकगृह या निकषांचा समावेश आहे. यातील सर्व निकष नसल्यास शाळांना मान्यता देता येत नाही. निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतो.
नियमाला आहे पळवाट
शहरातील ५१ शाळांना मैदाने नाहीत. काही शाळांनी क्रीडांगणाचे भाडे करारपत्र दाखवून आरटीईची मान्यता घेतली आहे. शिक्षण विभागानेही मान्यता दिली आहे. पण प्रत्यक्षात क्रीडांगणे नाहीत. तासिकांमध्ये आठवड्यातील चार तास खेळासाठी दिलेले असतानाही संगणक किंवा इतर विषयाचा अभ्यास उरकण्यावर भर दिला जातो. काही शाळांमध्ये क्रीडा शिक्षक देखील कार्यरत नाहीत.
कारवाई होणे गरजेचे
खेळामुळे विद्यार्थ्यांनाआत्मविश्वासवाढीस लागूनस्पर्धात्मक युगाचीमाहिती होण्यासमदत होते.खेळाचे तास असले पाहिजे. मात्र शहरातील बहुतांश शाळांमध्ये क्रिडांगणे नाहीत,ही खेदाची बाब. शिक्षण विभागाने कारवाई केली पाहिजे.- गजानन काशीद, पालक
तंदुरुस्ती महत्त्वाची
मैदानी खेळ मुलांच्या सदृढआरोग्य वबौध्दिकविकासासाठीआवश्यक आहे.आरोग्यहीतंदुरुस्त व निरोगी राह ते. व्यवस्थित भूक लागते. मानसिक संतुलनासाठी खेळ मदत करतो. खेळाडू वृत्ती निर्माण होते.- डॉ.अण्णासाहेब लोखंडे, बालरोगतज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.