आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाेटगी रस्त्यावरील विमानतळापासून नागरी उडान सेवा देण्यात १०६ नव्हे, तर तब्बल १९८ अडथळे असल्याचा अहवाल हाती आला आहे. त्या सर्वांना नोटीस बजावून हटवण्याच्या प्रक्रियेत कायदेशीर बाबींना भरपाई मिळू शकेल. परंतु कारखान्याच्या चिमणीला कुठल्याही प्राधिकरणाची परवानगीच नाही. म्हणजेच बेकायदेशीर असलेली चिमणी कशी वाचेल? अडथळ्यांची गर्दी वाढवल्याने त्यातून चिमणी वाचेल असा समज कोणी करून घेऊ नये, असे कारखान्याचे माजी तज्ञसंचालक संजयथोबडे म्हणाले.१९५३ मध्येहाेटगी रस्त्यावरविमानतळासाठीभूसंपादन झाले. त्यावेळच्या धावपट्टीची लांबी २००५ मीटर हाेती. त्यानंतर कारखाना अाला. त्याच्या ५० मीटर उंचीच्या दाेन चिमण्या अाल्या अाणि ‘एअरक्राफ्ट रूल्स’ आले.
त्याने धावपट्टीची लांबी १३६५ मीटर झाली. २००४ मध्ये कारखान्याने पाच हजार मेट्रिक टनाचा विस्तारित प्रकल्प राबवला. त्यात ३८ मेगाव्हॅट वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी जमिनीपासून ९२ मीटर उंच काे-जनरेशनची चिमणी उभी केली. ज्याला प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय विमानसेवा प्राधिकरण, महापालिका यांच्याकडून परवानग्याच नाहीत. तरीदेखील डीजीसीएने १३६५ मीटरचीच धावपट्टी वैध ठरवली अाणि नवीन चिमणीची उंची ५२ मीटर ठेवण्यास परवानगी दिली. दुसरीकडे चिमणीच्या उंचीने धावपट्टी नागरी विमानसेवेला धाेकादायक बनल्याचा अहवाल डीजीसीएने तयार केला. परिणामी विमानसेवा चालू होऊ शकली नाही. आता कारखान्याने केलेल्या कोर्ट-कचेऱ्यांमुळे परत २००५ मीटर पूर्ण धावपट्टी गृहित धरण्यात अाली.
तुम्हालाही विमानसेवा हवीच तर उत्तरे द्या
‘इन्व्हायरमेंट क्लिअरन्स’ मिळाल्याशिवाय विस्तारित प्रकल्प राबवू नका, असे २०१४ मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले हाेते. तरीही प्रकल्प पूर्ण का केला?काे-जनरेशनच्या चिमणीचे बांधकाम अर्धवट असताना महापालिकेने बांधकाम बेकायदेशीर असल्याची नाेटीस (कलम ४७८-२) बजावली. त्याला का जुमानले नाही? एनटीपीसीची चिमणी विमानतळापासून दूर आहे. तरीदेखील एनटीपीसीने डीजीसीएची ‘ना-हरकत’ घेतली. उच्च न्यायालयाच्या निकालात ही बाब स्पष्ट अाहे की नाही? राष्ट्रीय हरित लवादाने (रिट पिटीशन नं. १२६०२/ २०२२) इन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाल्याशिवाय कारखाना चालवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही सुरू कसा? हरित लवादाच्या निर्देशानुसार कारखान्याने अनेक तांत्रिक चुका करून ठेवलेल्या अाहेत. त्यावर दंड झाल्यास त्याची व्यक्तीश: जबाबदारी घेऊन दंड भरणार का?डीजीसीए चिमणीची जी उंची वैध ठरवेल, ती मान्य करून पाडकाम करून विमानसेवा सुरू करण्यास हातभार लावणार का?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.