आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीविषयी जनजागृती:मानवी साखळी ; पथनाट्याद्वारे वाहतूक जनजागृती

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने वाहतुकीविषयींच्या नियमांबाबत रॅली काढण्यात आली होती. यामध्ये मानवी साखळी व पथनाट्य द्वारे वाहतुकीविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विविध सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष शब्बीर औटी यांच्या मार्गदर्शनानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायालयाच्या आवारातून मानवी साखळी व रॅलीची सुरुवात करण्यात आली.

रॅली, पथनाट्यामध्ये एनसीसी, एनएसएस, स्काऊट गार्ड््स तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी, सर्व न्यायिक अधिकारी मल्लिनाथ शहाबादे यांच्यासह सर्व पॅनलचे विधिज्ञ उपस्थित होते. सिद्धेश्वर प्राथमिक प्रशालेच्या वतीने वाहतुकीच्या नियमांविषयी पथनाट्य सादर करण्यात आले. या शिबिरामध्ये संगमेश्वर महाविद्यालय, दयानंद कला व विज्ञान महाविद्यालय, वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, निर्मलाताई ठोकळ प्रशाला, सिद्धेश्वर प्राथमिक प्रशाला, हिंदुस्थान कॉन्व्हेंट हायस्कूल, हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय व प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...