आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्युलर धर्मस्थळे:पंढरपुरातील शेकडो मुस्लिमबांधव नियमित करतात एकादशी, आवाटी येथील दर्गा हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान

यशवंत पोपळे | सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मुस्लिम भाविकही येतात

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह सबंध देशभरातून विविध धर्मीय वारकरी बारमाही येत असतात. वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीच्या वार्षिक यात्रेला महत्त्व आहे. या यात्रेत राज्यभरातून अनेक दिंड्या येतात. त्यात श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील शेख मोहंमद यांची दिंडी दरवर्षी सहभागी असते. विदर्भ आणि मराठवाड्यातील मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. मुस्लिम समाजातील जैतुनबी यांचा पंढरपुरात मठ आहे. कबीर महाराज यांची गादीही पंढरपुरात आहे. पंढरपुरातील शेकडो मुस्लिम बांधव नियमित एकादशी करतात.

आवाटी येथील दर्गा हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान

करमाळा तालुक्यातील आवाटी येथे हाजी सय्यद वली चांद पाशा कादरी यांचा प्रसिद्ध दर्गा आहे. हे ठिकाण हजारो हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यातील अनेक ठिकाणांहून हिंदू- मुस्लिम भाविक‌ दर बुधवारी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. विशेषत: कर्नाटकातील विजापूर आणि कलबुर्गी जिल्ह्यातील शेकडो हिंदू भाविक आवाटी दर्ग्यात दर्शनासाठी येत असतात.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मुस्लिम भाविकही येतात

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवी मातेच्या दर्शनासाठी हिंदू भाविकांबरोबरच मुस्लिम भाविकदेखील नियमित येत असतात. मंगळवार आणि शुक्रवारी हिंदू परंपरेप्रमाणे दर्शन, महाप्रसाद, पूजा विधीसाठी मुस्लिम भाविक सहभागी होतात.

बातम्या आणखी आहेत...