आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक वर्षाअखेरच्या आधी खर्चाचे ताळेबंद साधण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. रस्तेकाम ३१ मार्चअखेर संपण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. या गडबडीत कामाचा दर्जा खालावत असून त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
महापालिकेच्या प्रत्येक झोनच्या माध्यमातून रस्त्याचे कामे केली जात आहेत. रस्त्याची कामे करत असताना जेव्हा खडी अंथरण्यात आली त्यावर मुरुम टाकला जातो. मुरुम टाकल्यानंतर त्यावर पाणी मारून रोलर फिरवणे महत्त्वाचे आहे. पाणी व्यवस्थित मारले जात नाही आणि रोलर नावाला फिरवले जात आहे. त्यामुळे त्यामध्ये मजबुतीकरण येत नाही. रोलर झाल्यानंतर त्यावर डांबर आणि त्यावर खडी आणि नंतर डांबर मिश्रीत खडी टाकली जाते. प्रत्येक खडीनंतर रोलर फिरवणे आवश्यक आहे. यानंतर पांढरी भुकटी टाकली जाते. जर रस्ता कॉँक्रिट करायचे असेल तर जेव्हा मुरुम टाकला जातो त्यावर रोलर फिरवून नंतर कॉँक्रिटीकरण केले जाते. अक्कलकोट रोड विनायक नगर, जुने विडी घरकुल, जुळे साेलापूर, विजापूर रोड आदी ठिकाणी अशा प्रकारे दर्जा सांभाळला जात नसल्याचे दिसत आहे. झोनकडून कामाची पाहणी नाही
रस्त्याचे काम करत असताना महापालिका झोनचे कनिष्ठ अभियंता यांनी येऊन पाहणी करणे गरजेचे आहे. परंतु रस्त्याचे पूर्ण काम होईपर्यंत कोणीही फिरकत नाही. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. नंतर बिल अदा करताना रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दर्जा चांगला असल्याचे प्रमाण झोन मार्फत दिलेल जाते.
डांबरी रस्त्यावर पाणी मारू नये
डांबरी रस्त्याचे काम झाल्यानंतर त्यावर निदान आठ ते दहा दिवस पाणी मारू नये. परंतु हे तांत्रिक कारण कोणालाही माहीत नसल्यामुळे रस्त्याचे काम होताच नागरिक नेहमीप्रमाणे दरराेज सकाळी पाण्याचा सडा मारतात. त्यामुळे ते पाणी झिरपले जाते आणि रस्त्याच्या कामाचे नुकसान होते. त्यासाठी ज्या ठिकाणी काम केले जाते त्याठिकाणी मनपा किंवा मक्तेदारांनी नागरिकांना माहिती देणे आवशयक आहे.
जाते. जर रस्ता कॉँक्रिट करायचे असेल तर जेव्हा मुरुम टाकला जातो त्यावर रोलर फिरवून नंतर कॉँक्रिटीकरण केले जाते. अक्कलकोट रोड विनायक नगर, जुने विडी घरकुल, जुळे सोलापूर, विजापूर राेड आदी ठिकाणी अशा प्रकारे दर्जा सांभाळला जात नसल्याचे दिसत आहे.
प्रत्येक विकासकामाचा दर्जा हा राखलाच पाहिजे आणि सर्व कामे शास्त्रीय पद्धतीने होणे खूप गरजेचे आहे. याबाबत उद्याच सर्व झोन अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांची बैठक बोलावून त्यांना सूचना करू. तसेच डांबरीकरण रस्त्याचे काम झाल्यानंतर नागरिकांनी त्या रस्त्यावर किमान पंधरा दिवस पाण्याचा सडा मारू नये. दररोजची वाहतूक सुरू ठेवावी. पाणी मारल्यामुळे रस्त्याचा दर्जा टिकणार नाही.’’ संदीप कारंजे, नगरअभियंता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.