आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीव गमावला:वादवादीत पत्नीच्या मागे पळताना पती भोवळ येऊन पडला, जागेवर जीव गमावला, आकस्मात मृत्यूची नोंद

उत्तर सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोंडी येथे एकाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. जितेंद्र शिवाजी पोळ (वय ४५) रा. अश्विनी कॉलनी, सोरेगाव कॅम्प, सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिस स्थानकात त्याची आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मात्र स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वेगळाच प्रकार समोर येत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी कोंडी येथे राधेश्याम नगर परिसरात एका महिलेची व मृत पोळ यांची तक्रार सुरू होती. यानंतर ती महिला तिच्या सोबत असणाऱ्या एका इसमाच्या गाडीवर बसून निघून गेली. या गाडीचा पाठलाग करताना पोळ यांना भोवळ आली व ते जागेवर कोसळले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पोळ कुठलीच हालचाल करत नसल्याने ॲम्बुलन्स बोलावली व उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर महिला ही मयत पोळ यांची पत्नी असून या पती पत्नी मध्ये कौटुंबिक वाद सुरू आहे. त्यामुळे पोळ यांच्या पत्नी त्यांच्यापासून विभक्त असून त्या कोंडी येथे राहत आहेत. सोमवारी यांना पत्नी कोंडी येथे राहत आहे हे कळल्यानंतर ते तेथे आले होते. यावेळी त्यांची पत्नी व पत्नी सोबत असणारा एक इसम व मृत पोळ यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

शवविच्छेदन अहवालात प्राथमिक दृष्ट्या पोळ यांचा मृत्यू अंतर्गत रक्तस्रावामुळे झाल्यातचा अहवाल देण्यात आला आहे अशी माहिती तालुका पोलीस स्थानकाचे सहाय्यक फौजदार राठोड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...