आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती हिसांचार:हुंडा न मिळाल्याने गर्भवती पत्नीच्या जीवाशी खेळ; पत्नीला उपाशी ठेवून पतीकडून अमानुष छळ

सोलापुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजही आपल्या समाजात सासरकडून हुंडा न मिळाल्याने महिलांना छळले जाते. आपल्या समाजात महिलांना या हुंड्यासाठी अनेक यातना सहन कराव्या लागतात. हुंडा देणे आणि हुंडा मागणे हा कायद्याने गुन्हा असून सुद्धा आपल्या देशात समाजात हुंड्यायाठी सासरच्या मंडळींकडून त्रास दिल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापुर येथे राहणाऱ्या गर्भवती महिलेसोबत घडला. हुंडा हवा म्हणून पतीकडून या महिलेचा रोज अमानुष छळ होत होता. एवढेच नाही तर या महिलेला तो रोज उपाशी ठेवत असे, तसेच ती गर्भवती आहे हे माहित असून तिला लाथा-बुक्क्यांनी मारत असे. याप्रकरणी पीडित महिलेने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

असा होत होता छळ

दोन लाख देऊन सुद्धा समाधान न झाल्याने पुन्हा त्यांनी एक लाखाची मागणी केली. पीडित महिला गर्भवती असून देखील आरोपींनी तिला उपाशीपोटी ठेवत अमानुष छळ केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळाच्या कलमाअंतर्गत या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती अभिषेक दरगड, सासू प्रेमा दरगड आणि सासरे राजगोपाल दरगड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्या विरोधात मनीषा दरगड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा यांचा 2017 साली अभिषेक दरगड याच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर मनीषा यांना एक वर्ष सासरच्यांकडून चांगली वागणुक मिळत होती. मात्र लग्नानंतर एक वर्षाने पतीसह सासू आणि सासऱ्यांनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. तसेच माहेरच्या लोकांकडून पैसे आण असा देखील दबाव टाकण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...