आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक स्नेहमेळावा:भजन, गीत, मिमिक्री, एकल , समूह नृत्य,‎ ; लावणीच्या तालावर आशा वर्कर ‘झिंगाट’‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कलेची पार्श्वभूमी नसताना फक्त छंद जोपासत आशा वर्कर महिलांनी वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रमात भजन, लावणी, सोलो डान्स, ग्रुप डान्स, गीत, मिमिक्री करीत आपल्या कलेचे झिंगाट सादरीकरण केले. याला प्रेक्षक महिलांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आशा वर्कर महिलांचा लाल बावटा आशा वर्कर व गटप्रवर्तक युनियन यांच्या वतीने वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम सोमवारी दुपारी बारा वाजता रंगभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका नसिमा शेख होत्या. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कला सादर करणारे आणि टाळ्यांची दाद देणारे हे दोन्ही आशा वर्कर होते. अंजली शिंदे यांनी ‘ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात...’ ही लावणी सादर करताच उपस्थित महिलांनी शिट्या आणि टाळ्या वाजवून कलेला दाद दिली. यानंतर सोलो डान्स सादर झाला. हे सोलो डान्स सैराट चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट आता उतावीळ झालाे गुडघा बाशिंग बांधलं...’ सादर झाले. गाणे आणि डान्स या सादरीकरणाने सभागृह डाेक्यावर घेतले.

प्रेक्षक महिलांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. यानंतर ‘तुम बिन जाऊ कहा...’,‘देश मेरा रंगीला..’,‘नही मिलेगा एेसा घागरा...’,‘ जाे जाएगी बल्ले बल्ले...’ अशी एकापेक्षा एक बहारदार नृत्य आणि सुरेल गीते सादर करण्यात आली. यावेळी संघटनेचे सिध्दाराम उमराणी, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, मलेशाम कारमपुरी, मंगल वावरगिरे, ज्याेती उराडे यांच्यासह अनेकजण उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...