आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:‘इसमें मुझे सैतान दिखता है’ म्हणत वृद्धावर राॅडने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘इसमें मुझे सैतान दिखता है’ असे म्हणत एक ३४ वर्षीय रुग्णाने त्याच वाॅडाॅमध्ये उपचार घेणाऱ्या ७० वर्षीय रुग्णावर सलाइन राॅडने हल्ला केला. डाेक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी युसूफ पिरजादे (वय ३४, रा. तिरंगानगर, विडी घरकूल सोलापूर) याच्याावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत वृद्ध अनोळखी अाहे. या प्रकरणी डॉक्टर सौरभ संजय राऊत (वय २७, रा. शासकीय रुग्णालय वसाहत) यांनी सदर बझार पोलिसांत मंगळवारी मध्यरात्री तक्रार दिली.

२० जानेवारी २०२१ रोजी एका ७० वर्षीय बेघर व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पायाच्या बोटाला जखम झाल्यामुळे त्याच्यावर बी ब्लॉकमध्ये उपचार सुरू होते. तर युसूफ पिरजादे याला ११ सप्टेंबर रोजी छातीमध्ये पाणी भरल्यामुळे त्याच्यावर बी ब्लॉकमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून या खून प्रकरणी उपचारानंतर युसूफवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी दिली.

रात्री अचानक हल्ला : ७० वर्षीय व्यक्तीचे कोणीही नातेवाईक नाहीत. १०८ रुग्णवाहिका चालकाने जेऊर येथून त्याना उपचारार्थ दाखल केले होते. त्याच्या याच्या बोटाला गंभीर जखम झाली होती. वृद्धाला व्यवस्थित बोलताही येत नाही. त्याला काहीच आठवत नाही. सोमवारी रात्री अचानक युसूफने ‘इसमे मुझे सैतान दिखता है’, म्हणत सलाइनच्या सळईने या वृद्धाच्या डोक्यावर हल्ला केला. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे वाडाॅत भीतीचे वातावरण पसरले. वरिष्ठ डॉक्टर, पोलिस अधिकारी घटनास्थळी पाहणी करून चौकशी सुरू केली आहे. तपास अधिकारी फौजदार शांताराम वाघमारे म्हणाले, या घटनेची चौकशी सुरू आहे. मृताची ओळख पटवण्यासाठी माहिती घेत आहोत.

तपासात माहिती कळेल
घटनेची चौकशी सुरू आहे. पिरजादे याच्याबाबतही आणखी डॉक्टरकडून वैद्यकीय माहिती घेण्यात येईल. त्याने हा प्रकार कशामुळे केला‌? काय कारण आहे, डॉक्टरचा सल्ला घेऊन चौकशी करण्यात येईल. तसेच जी व्यक्ती मरण पावली त्याबाबतही काही माहिती मिळते का, याचाही शोध घेण्यात येईल. - कमलाकर पाटील, पोलिस निरीक्षक, सदर बझार ठाणे

बातम्या आणखी आहेत...