आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंच्या कथित पत्नीचे विधान:'धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल', करुणा शर्मा यांचे विधान

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर करुणा शर्मा या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला होता. तसेच आपण सक्रीय राजकारणामध्ये येणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान त्या आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांनी पंढरपुरात याविषयी घोषणा केली. यावेळी त्यांनी एक वक्तव्य केले आहे. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पंढरपुरात बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, '43 वर्ष हे राजकारणात यायचे वय नाही. 22-25 व्या वर्षी राजकारणात यायला हवे होते. माझे भविष्य राजकारणात असते. मात्र मी किती जगेल हे माहीत नाही. तरी देखील मी राजकारणात यायचे आणि लोकांसाठी आवाज उठवण्याचे कारण म्हणजे मी घरात गेल्या 25 वर्षांपासून राजकारण पाहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल.'

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यासमोर आला होता. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण परळीतून निवडणूक लढवणार आहोत असे देखील करुणा शर्मा म्हणाल्या होत्या. गेल्या वर्षी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान आता त्या काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लढवणार आहेत. येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील.

बातम्या आणखी आहेत...