आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:जास्त सभासद नोंदणी केल्यास उमेदवारी अन् सन्मानाची पदे, आमदार प्रणिती शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांना लालूच

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमध्ये सर्वाधिक सभासद नोंदणी करून पक्षाची ताकद वाढवा. जास्त सभासद नोंदणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी, पक्षात सन्मानजनक पदे देण्यासाठी विचार करण्यात येईल, असे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. काँग्रेसच्या डिझिटल सभासद नोंदणीची आढावा बैठक राज्य समन्वयक आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये झाली.

काँग्रेस पक्षाने ७० वर्षांमध्ये देशामध्ये रेल्वे, एअरपोर्ट, धरणे, कालवे, पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल, वस्त्र निर्मिती, असे अनेक उद्योग निर्माण केले व जनतेला रोजगार निर्माण करून दिला. पण जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्व सरकारी कंपन्या विकल्या. चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सर्वसामान्याला महागाईच्या खाईत ढकलणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या बैठकीस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक रियाजभाई हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका फिरदोस पटेल, परवीन इनामदार, प्रदेश सचिव अलका राठोड, अॅड. मनीष गडदे, नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, उदयशंकर चाकोते, बाबूराव म्हेत्रे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, युवक प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, सायमन गट्टू, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, सागर शहा, उपाध्यक्ष आंबदास गुत्तीकोंडा, श्रद्धा हुल्लेनवरू, केशव इंगळे, मल्लिनाथ सोलापुरे, यल्लप्पा तुपदोळकर, अप्पासाहेब बगले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...