आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • If The Farmers Have Any Sympathy, Return Their Factory, Criticizes NCP's State Spokesperson And Zilla Parishad Member Umesh Patil | Marathi News

टिका:शेतकऱ्यांचा कळवळाच असेल तर त्यांचा कारखाना परत करा, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांची टिका

मोहोळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात परंपरेने चालत आलेले गुलामगिरीचे राजकारण युवकांना मान्य नाही. प्रत्येक गावातील तरुण पिढी अन्याय, अत्याचाराविरोधात पेटून उठली आहे. तालुक्याच्या नेतृत्वाला जर खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कळवळाच असेल तर ज्या सभासदांचा कारखाना होता, तो त्यांना परत करून टाका? नाहीतर कारखाना हडप केल्याचे तरी मान्य करा, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

तसेच तालुक्याच्या नेत्यांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधातही त्यांनी तोफ डागली. वाफळे येथे सचिन चव्हाण यांनी सभेचे आयोजन केले होते. या वेळी उमेश पाटील बोलत होते. व्यासपीठावर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, राहुल गुंड, सचिन मेहता, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्यामराव जवंजाळ, राजाभाऊ शिंदे, भीमराव वसेकर, श्रीराम दाढे, अंकुश खडूळ, सुजित माळी, राहुल दाढे, समाधान दाढे, मच्छिंद्र चव्हाण, गणेश दाढे, सचिन जवंजाळ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...