आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बोटिंग व्यवसाय करायचाय तर हप्ता द्यावा लागेल

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव येथे बोटिंग व्यवसाय करायचा असेल तर दहा हजाराचा हप्ता द्यावा लागेल, अशी दमदाटी केेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिसांत दाखल झाली. तक्रारीवरून रोहन जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी ) याच्यावर गुन्हा दाखल झाला. दमदाटी, मारहाणीची ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धर्मवीर संभाजी तलाव येथे घडली.

जुबेर इक्बाल शेख (वय २६, रा. दोन नंबर झोपडपट्टी) यांनी फिर्याद दिली आहे. शेख हे बोटिंगचे तिकीट विक्री करत असताना तेथे रोहन जाधव आला, तिकीट न काढता बोटिंगसाठी आलेल्या पर्यटकांना ढकलाढकली करून बोटिंग पॉईंटवर गेला. तेथे पर्यटकांना सुरक्षा जॅकेट पुरविणारा श्रीनिवास परदेशी यानेही तिकिटाबाबत विचारणा केली. फिर्यादी जुबेर शेख, परदेशी, सय्यद अझमोद्दीन, सद्दाम काझी,अरबाझ काझी, आयाज जमादार, रोहीत येडगे, खिजर मकानदार हे तेथे आले. त्यावेळी जुबेर शेख यांना शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर तिकिट बुकिंगच्या ठिकाणी येऊन बुकिंग शटर उघड, मला दहा हजारांचा हप्ता द्यावा लागेल, नाही तर मी सर्वांना बघून घेईल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...