आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिमा गणरायाचा:देश-परदेशातही गणरायावर अपार श्रद्धा, नाणी अन् चलनी नोटांवर बाप्पांची रूपे; केवळ भारतच नव्हे तर विविध देशांत गणरायाला मानले जाते आराध्य दैवत

रामेश्वर विभुते |सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंडोनेशियात सक्रिय असणाऱ्या ज्वालामुखीच्या तोंडावर गेल्या 700 वर्षांपासून बाप्पा विराजमान

शुभ कार्यात सगळ्यात पहिला मान गणपती बाप्पाला दिला जातो. भारतात घरांवर, दारावर, महत्त्वाच्या वस्तूंवर आणि अगदी कारमध्ये सुद्धा गणेशाच्या प्रतिमा आढळतात. लोकांच्या या श्रद्धेमुळे भारतात आणि परदेशातही बाप्पांची विविध रूपे पाहायला मिळतात. भारतातील विविध संस्थांनांच्या चलनांवर तसेच मुस्लिमबहुल अशा इंडोनेशिया देशातही २०००० रुपयांच्या नोटेवरसुद्धा गणेशाचे चित्र दिसते.

इंडोनेशियात नोटांवर गणरायाचे चित्र तर आहेच, पण याच देशात सक्रिय असणाऱ्या ज्वालामुखीच्या तोंडावर गेल्या ७०० वर्षांपासून बाप्पा विराजमान आहे. इंडोनेशियामध्ये एकूण १४१ ज्वालामुखी आहेत, ज्यापैकी १३० अजूनही सक्रिय आहेत, ज्यात सतत स्फोट होत असतात. यापैकी एक माउंट ब्रोमो डोंगरावरील ज्वालामुखी. जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असल्याने इंडोनेशियात जाणाऱ्या पर्यटकांना येथील अनेक भागांत जाण्यास बंदी आहे. परंतु, ज्वालामुखी धोकादायक असतानाही येथील लोक या डोंगरावरील प्राचीन गणेश मंदिरात जातात. त्यांची अशी श्रद्धा आहे की, गणेशामुळेच ते सुरक्षित आहेत. येथील मूर्ती ७०० वर्षांपासून आहे. ही गणेश मूर्ती ज्वालामुखीच्या जवळ असूनही येथील लोकांचे रक्षण करते अशी श्रद्धा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मिरज, सांगली, कुरूंदवाड ज्युलिअर, जमखंडी आदी महत्त्वपूर्ण संस्थानांचे कुलदैवत गणेशच होते. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थानातील कोर्ट फी स्टॅम्प व बाँड पेपरवर गणपतीचा बसलेला फोटो छापला आहे.

दतिया संस्थानातही श्रीगणेशच

मध्य प्रदेशातील बुंदेलखंड भागात दतिया नावाचे छोटे संस्थान होते. या संस्थानने १८९३ मध्ये आपली पाच प्रकारची टपाल तिकिटे प्रसिद्ध केली होती. त्यावरही आपल्याला गणपती बाप्पांच्या प्रतिमा दिसून येतात.

विविध संस्थांच्या नाणी, टपाल तिकिटे व नोटांवर गणरायाची प्रतिमा

श्रीगणेश हे बहुधा हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत मानले जाते. परंतु, असे नसून विविध धर्मीयांत गणरायाची पूजा होते. मी एक संग्राहक असून माझ्याकडे विविध संस्थानांची नाणी, टपाल तिकिटे व नोटा आहेत, ज्यावर श्रीगणेशांच्या प्रतिमा आहेत. नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक.

अनेक गोष्टींवर आहेत बाप्पा

भारतात अनेक संस्थाच्या व राजघराण्यांच्या चलनावर गणराय आहेत. चलनी नाणी, नोटा, कोर्ट फी स्टॅम्प, बाँड पेपर, पोस्टकार्ड व इतर दस्तऐवज इतिहासजमा झालेले असले तरी त्यांचे महत्त्व अबाधित आहे. इंडोनेशियात नोटांवर लाडक्या बाप्पाचे चित्र आहे.