आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन विधी:विसर्जनाला खास मुहूर्ताची गरज नाही, ना वाहत्या पाण्याचे बंधन, दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांची माहिती

विनोद कामतकर | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"अनंत चतुर्दशीदिनी उत्तरपूजन करून श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. त्यासाठी कोणत्याही स्वतंत्र मुहूर्ताची आवश्यकता नाही. गणेश मूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे. पण, त्यासाठी पाणी वाहतेच असले पाहिजे असे कोणतेही बंधन नाही', अशी माहिती दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली. विसर्जनाच्या विधीबाबत "दिव्य मराठी'ने त्यांच्याशी संवाद साधला. गणपती बाप्पांचे घरीच विसर्जन केल्यानंतर ते पाणी आणि माती झाडांना घालण्याचा पर्यावरणपूरक पर्यायही त्यांनी सुचवला.

भारतीय परंपरेनुसार दिवसभरात घरगुती, सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करता येते. अगदी घरी गर्भवती स्त्री असताना देखील गणेशमूर्ती शास्त्रशुद्ध विसर्जन करणेच योग्य आहे. अनेकांकडे यंदाची गणेशमूर्ती पुढील वर्षी विसर्जनाची प्रथा आहे. मात्र, ती शास्त्रोक्तदृष्ट्या तितकीशी योग्य नसल्याचे पंचांगकर्ते ओंकार दाते म्हणाले.

"गणेश चतुर्थीला मंगलमूर्ती गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. त्यानंतर प्रथेनुसार अनेकांकडे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचे विसर्जन असते, त्यांनी त्याच दिवशी विसर्जन करावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे. पण, त्यासाठी पाणी वाहते असले पाहिजे, असे कोणतेही बंधन नाही' असे ते म्हणाले. त्यामुळे घरीच बादली, मोठे पातेले, टफ आदींमध्ये पाणी भरून त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करता येईल. त्यानंतर पाणी, माती झाडांना घालू शकता.

अनंत चतुर्दशीला विसर्जन न झाल्यास... काही कारणास्तव, अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करणे शक्य नसल्यास, उत्तर-पूजन करून ‘पुनरागमनायच’ असे म्हणत मूर्ती जागेवरून उचलून पुन्हा ठेवल्यास, तेही विसर्जन झाले असे मानले जाते. श्रींच्या उत्सवातील निर्माल्य पाण्यामध्ये न टाकता, घरीच खत करता येईल, असेही ओंकार दाते सांगितले.

बातम्या आणखी आहेत...