आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोन अधिकाऱ्यांची बैठक:शहरात 12 ठिकाणी विसर्जन कुंड, मूर्ती संकलनाचे 84 ठिकाणी केंद्र

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर तलावजवळील गणपती घाट, विष्णू घाट, संभाजी महाराज तलावासह १२ ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात येणार आहेत. शहरात घरगुतीसह मंडळांच्या मूर्ती गोळा करण्यासाठी ८४ ठिकाणी केंद्र करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात बहुतांश मंगल कार्यालय व महापालिका शाळांचा समावेश आहे. विसर्जन तयारीसाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी झोन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. महापालिका आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी विसर्जन स्थळ व रस्त्याची पाहणी केली.

गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन तयारी करत असून, ९ व ११ व्या दिवशी विसर्जन करण्यासाठी मंडळे उत्सुक असतात. ११ व्या दिवशी विसर्जनासाठी गर्दी असते. विसर्जन स्थळी दिवाबत्ती, सुरक्षा रक्षक, बॅरेकेडिंग, निर्माल्य संकलन आदीची व्यवस्था करण्याची सूचना आयुक्तांनी नगर अभियंता संदीप कारंजे यांना दिली.इथे विसर्जन कुंड : गणपती घाट, विष्णू घाट, हिप्परगा येथील दगड खाण, विडी घरकुल येथील विहीर यासह १२ ठिकाण विसर्जनासाठी निश्चित करण्यात आले आहेत. मूर्ती संकलनासाठी झोननिहाय ८४ ठिकाणे निश्चित केली आहेत. तेथे मनपा अधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते असतील.

लष्कर मध्यवर्तीचे कार्यकर्ते आयुक्तांना भेटले
तीन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचे विसर्जन हिप्परगा येथील दगड खाणीत करावे, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. याविषयी लष्कर मध्यवर्ती मंडळाचे देवेंद्र भंडारे, रवी कय्यावाले, भारत बडूरवाले, भारत परळकर यांनी सोमवारी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. उंच मूर्ती संभाजी तलावापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते आणतील. तेथून ती नेण्याची व्यवस्था महापालिकेने करावी, अशी मागणी मंडळाने केली.

बातम्या आणखी आहेत...