आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुढील महिन्यापासून अंमलबजावणी, प्रायोगिक तत्त्वावर 16 गाड्या सुरू, प्रत्येक झोनमध्ये दोन घंटागाड्या

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कचरा विलगीकरणात पाच प्रकार, घंटागाडीत पाच कप्पे

शहरात पाच प्रकारांत विलगीकरण करून कचरा गोळा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिका प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक झोनमध्ये दोन घंटागाड्या सुरू करणार आहे. या घंटागाड्यांत पाच कप्पे असणार आहेत. ओला, सुका, ई-वेस्ट, घरगुती वैद्यकीय आणि घातक कचरा असे पाच प्रकार केले आहेत. घरात फुटलेल्या काचा महापालिकेच्या घंटागाडीत देता येणार आहेत. हा कचरा बायोएनर्जी कंपनी विकत घेणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. शहरात घनकचरा व्यवस्थापन सुधारण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. असलेले घंटागाड्या वारंवार बंद पडत असल्याने नव्याने ३५ घंटागाड्या खरेदी करण्यात येणार आहे. १२८ गाड्या आहेत. पुढील महिन्यापासून घंटागाडीत पाच प्रकारचा कचरा संकलन होणार आहे. ते महापालिकेच्या चार कचरा संकलन केंद्रावर वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. नागरिकांनी कचरा वर्गीकरण करून महापालिका केंद्रावर आणल्यास तेथे बायोएनर्जी कंपनी तो विकत घेईल. प्रयोगातील अनुभवनानंतर त्याचा विस्तार करण्याचा विचार होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण निरीक्षण सुरू, केंद्राचे पथक आले
स्वच्छ सर्वेक्षण निरीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचे सात जणांचे पथक सोलापुरात मागील दोन दिवसांपासून आले आहे. विशेष म्हणजे त्यात सर्व महिला आहेत. इंदिरानगर, नीलमनगर, जीवन विकासनगर, मोटे वस्ती, स्वागतनगर, रंगराजनगर, दयानंद कॉलेज, जोशी गल्ली आदी भागात या पथकाने भेट दिली. शौचालय, घंटागाडी आदी निरीक्षण हे पथक केंद्र सरकारच्या सूचनेनुसार करत आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...