आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय जैन साहित्य संमेलन:राष्ट्रबांधणीमध्ये साहित्याचे योगदान महत्वाचे, पानिपतकार विश्वास पाटील यांचे प्रतिपादन

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आले. दीपप्रज्वलन व भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राजकारणी लोक जात पाहिल्याशिवाय कार्यकर्ते लोकांना जवळ करत नाहीत. महाराष्ट्राला थोर महापुरुष व संताच्या विचारांचा वारसा लाभला आहे. जाती पातीच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. देशाला जोडण्याचे व राष्ट्रबांधणीमध्ये साहित्याचे महत्वाचे योगदान आहे. असे प्रतिपादन पानिपत कार विश्वास पाटील यांनी केले.

याप्रसंगी गाथा कर्मविरांची, विचारमंथन व्यक्तीवेध, शोध भारत नावाचा आदी ग्रंथाचे प्रकाशन ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलन स्वागताध्यक्ष मिलिंद फडे, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, प्राचीन मराठीचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, संजीव पाटील, सुरेखा शहा उपस्थित होते. पुढे बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, जैन साहित्य कारांनी एका खोलीत बसून साहित्य निर्मिती करण्यावर भर देता मुक्तपणे संचार केला पाहीजे. राना वनात फिरल्या शिवाय अनुभव मिळत नाही. साहित्यांची निर्मिती ही प्रत्येक मुद्द्याच्या खोलात जावून केली पाहीजे तरच ते साहित्य वाचनीय होते.

स्वागताध्यक्ष सदानंद मोरे म्हणाले की, सोलापुरात तिसऱ्यांदा जैन साहित्य संमेलन होत आहे. शहराला साहित्याची परंपरा असून वैचारिक दिशा देण्याचे कामही साहित्याच्या माध्यमातून होत आहे. तसेच भारतीय जैन समाज, ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी असलेली भाषा स्विकारुन त्या भाषेचे उदात्तीकरण, प्रतिष्ठा वाढवली आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मिलिंद फडे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा कटारे व सोनम पाटील यांनी केले.

महाराष्ट्रातील जैन लोकांचे प्रश्न, समस्या व मराठी जैन समाजाची अस्मिता याबाबत फारच कमी लिहिले जाते. जैन समाजासाठी साहित्य निर्माण करायचे असेल तर त्या समाजाच्या मानसिकतेचे, जैन शेतकऱ्यांचा समस्या, व्यापारी-शिक्षण यावर साहित्यामध्ये वास्तवाला धरुन लिखाण असायला हवे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दाराशी आलेल्या सुखाची चटक वाढली आहे. आयात, पैसा, श्रम न करता भरपूर संपत्ती मिळवण्याची जुगारी प्रवृत्ती वाढली आहे. प्रामाणिक कष्ट हे ओझे वाटू लागले आहे. विद्यार्थ्यांना श्रमातून कमावलेले वैभव हेच खरे वैभव असते हे सांगण्याचे धाडस पालकांना राहिले नाही. मुलांच्या मनाविरुध्द त्यांच्यावर शिक्षण लादले जाते. शिक्षणाबरोबर इतर ज्ञानही तितकेच महत्वाच असून पालकांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन संमेलन अध्यक्ष डॉ.रावसाहेब पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...