आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात घरोघरी नळाला मीटर:पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी घरोघरी नळाला मीटर बसवण्यात येणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. घरगुती नळा प्रती हजार लिटर पाण्यास ११.५० रुपये तर वाणिज्यसाठी ३५ तर उद्योगासाठी ७० रुपये दर असणार आहे. दर तीन महिन्यानी नागरिकांना बिले देण्यात येतील. मीटरसाठी नागरिकांनी यापूर्वी पैसे भरले असेल तर ती रक्कम वजा होईल. इलेक्ट्रीक वाहन व चार्जिक स्टेशन असणाऱ्यांना २ ते ५ टक्केपर्यंत करात सूट देण्यात येणार आहे. विना परवाना बांधकाम असल्यास त्यांना दुप्पट कर आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

शहरात सुमारे २.०८ नळ मालमत्ता असून, यापैकी १.९२ लाख नळांचे वाॅटर आॅडीट करण्यात आले. अन्य घराचे आॅडीट सुरु आहे. प्रत्येक घरास इलेक्ट्रीक व मेकॅनिक मीटर बसवण्यात येणार आहे. त्यासाठी दर निश्चीत करणे सुरु आहे. फरकांची रक्कम तीन टप्यात नागरिकांकडून वसुल करण्यात येईल.

विना परवाना आणि वाढीव बांधकाम केले असेल तर त्यांना पालिकेचे कर दुप्पट असेल, वापर परवाना नसेल तर दिडपट आकारणी असेल. अशा मिळकतीचे शोध घेण्यासाठी नगररचना, आरोग्य निरीक्षक आणि प्रोत्सासन बक्षिस योजना माध्यमाचा वापर केला जाणार आहे. विनापरवाना घरास दुप्पट कर

बोगस नळ सापडतील
शहरात बोगस नळ धारकांना मोफत पाणीपुरवठा होईल अशी शंका व्यक्त करुन प्रामाणिकपणे बिल भरण्याऱ्यांना मीटर तर इतरांना नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, प्रत्येक ठिकाणी फ्लो मीटर लावले आहे. यातून तपासणी केल्यास बोगस नळ सापडतील.

बातम्या आणखी आहेत...