आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकप राज्य समितीची बैठक:राज्यातील ज्वलंत प्रश्नांसोबत आगामी निवडणुकीच्या धर्तीवर महत्त्वाचे निर्णय घेणार

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य समितीची बैठक 6 ते 8 डिसेंबर 2022 दरम्यान सोलापुरात होणार आहे. या बैठकीसाठी राज्यातून विविध वर्गीय लढ्यातील व जनवादी चळवळी तील शेतकरी, कामगार नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत राज्यातील वाढती महागाई, तरुणांची बेरोजगारी, शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण, दलित-अल्पसंख्यांक आदिवासी व महिलांवरील वाढते अत्याचार या ज्वलंत प्रश्नांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, निवडणुकीची रणनीती, धोरणे आणि पक्षाची भूमिका 2024 साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी या अनुषंगाने महत्वाचे निर्णय व ठोस कार्यक्रमाची आखणी, 7 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4.30 वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे माकपाचे नूतन पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे, माजी खासदार कॉ. नीलोत्पल बसू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महासचिव कॉ. मरियम ढवळे, माकपाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, आदिवसी व शेतकरी नेते माजी आमदार कॉ. जीवा पांडू गावित यांचा कामगारांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठनेते माजी आमदार, कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

गुरुवार (24 नोव्हेंबर) 2022 ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे प्रसार माध्यमांशी वर्तालाप केले.

ते बोलताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांपासून ते विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या न्याय हक्कांच्या प्रश्नासाठी अविरतपणे वर्गीय लढा आणि युवा, विद्यार्थी, महिलांच्या प्रश्नांसाठी जनवादी चळवळ निरंतर चालू ठेवण्याचे काम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

देशाची नागरी कल्याणकारी संकल्पना आणि त्यांना मिळालेले घटनात्मक हक्क, अधिकार याबाबत जागृती व जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे. याच अनुषंगाने सध्या राज्यातील जनतेचे अनेक ज्वलंत प्रश्न आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर लोकसभा व विधान सभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकीसाठी राज्यातील मुंबई, ठाणे-पालघर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार, सोलापूर या आणि महाराष्ट्रातल्या अन्य प्रांतातून जवळजवळ 60 राज्य समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...