आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची बातमी:सोलापूरकरांनो वाढीव बांधकाम कळवा, अन्यथा एकतर्फी कर लागणार; आयुक्तांचा इशारा

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर महापालिकेने कर आकारणी नूतनीकरणाच्या नावाने नागरिकांना चुकीच्या नोटीस दिल्या. त्यानंतर पुन्हा वाढीव बांधकामाची माहिती मिळकतदारांकडून मागवण्यास प्रक्रिया सुरू केली आहे. मिळकतदारांनी ही माहिती न दिल्यास पालिका ज्ञात माहितीच्या आधारे कर आकारणी करू, असा इशारा पालिका कर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी दिलाय.

सन 2005 पूर्वी महापालिकेने कराचे नूतनीकरण केले. त्यानंतर वाढीव बांधकामे गृहीत धरून पालिकेने नागरिकांना नोटीस दिली. त्यांची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांनी हरकती घेण्यास सुरुवात केली. लोकप्रतिनिधीकडून त्यास विरोध झाल्यानंतर दिलेली नोटीस पालिकेने मागे घेत रद्द केली. त्यानंतर पुन्हा नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.

तर एकतर्फी कर आकारणी

ज्या नागरिकांनी मालमत्तेच्या क्षेत्रफळात वाढ केली आहे, विकसित केले, भाड्याने दिले अशा मालमत्तेच्याकरात पालिकेकडून बदल झाला नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी महापालिकेस माहिती कळवावे. ही माहिती नाही दिल्यास, पालिका या मिळकतीची माहिती समजल्यास एकतर्फी कर आकारणी करणार आहे.

प्रसिद्ध करणार

वाढीव बांधकाम किंवा इमारतीत बदल केल्यास त्यानुसार कर आकारणी करणे आवश्यक आहे. मिळकतदारांनी त्वरीत पालिकेस कळवून कर आकारणी करून घ्यावी. अन्यथा पालिका ज्ञात माहितीच्या आधारे आकारणी करेल. त्यावेळी मिळकतदारांस हरकत घेता येणार नाही.

- श्रीराम पवार, सहाय्यक महापालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...