आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरगावमध्ये ढगफुटी सदृश स्थिती:अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस; 3 गावांचा संपर्क तुटला

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे, घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले यासह आदी गावात पावसाने थैमान घालत शेतीपिकाचे मोठे नुकसान केले. काही गावांचा सम्पर्क तुटला आहे. बोरगाव मध्ये ढगफुटी सारखा पाऊस पडला असून अनेकांच्या घरात व पिकामध्ये शिरल्याने नुकसान झाले आहे. कुरनुर धरणातून 600 क्युसेक विसर्ग बोरी नदीत सोडण्यात येत आहे.

घोळसगाव तलावपूर्ण भरल्याने ओव्हरफ्लो झालाय. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव 100 टक्के भरले असून बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव घोळसगाव बादोले वागदरी शिरवळ सापळे आदी भागात बुधवारी दुपारी नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत होते. बोरगाव येथील पीर राजे बागसवार साठवण तलाव, घोळसगाव तलाव टक्के भरले असून त्याच बरोबर घोळसगाव साठवण तलाव १०० टक्के भरला आहे. काही भागात उभे असलेले उसाचे पीक आडवे पडले असून काही भागात मोठे नुकसान झाले आहे.

पुलावर पाणी असल्याने संपर्क तुटला बोरगाव नजीक असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दुपार पासून घोळसगाव व वागदरी कडे जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद पडला होता.त्यामुळे गावचा संपर्क तुटला होता.

बातम्या आणखी आहेत...