आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवार, दि. २९ एप्रिलला ५२ हजार ५०० रुपये विकल्या गेलेल्या सोन्याच्या दरात दोनच दिवसांत एक हजार रुपयांची घट झाली. सोमवारी बाजार उघडताच ५१ हजार ५०० रुपये सोन्याचा दर होता. मंगळवारी अक्षय्यतृतीयेला हा दर स्थिर राहील. मुहूर्तावर अधिक खरेदी होईल, अशी अपेक्षा सराफ व्यापारी बाळगून आहेत. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही ‘क्षय’ म्हणजेच नाश होत नाही आणि अक्षय्य तृतीया म्हणजे ज्या शुभ तिथीचा कधीच नाश होत नाही अशी तिथी. या शुभमुहूर्तावर सोन्याची खरेदी होते. ग्राहकांच्या स्वागतासाठी सराफ व्यापारी सज्ज झाले आहेत. लग्नसराईची खरेदी असल्याने मंगळसूत्राचे अनेक प्रकारही सुवर्णदालनात दिसून येतात. सोन्यातील गुंतवणुकीसाठी खास छोटी बिस्किटेही बाजारात आली आहेत. अक्षय्य तृतीयेला अस्सल मराठमोळ्या दागिन्यांनाच ग्राहक पसंती देतात म्हणून बोरमाळ, नेकलेस, राणीहार आदी आदींचे अनेक प्रकार ठेवल्याचेही व्यापारी म्हणाले.
चांदीच दरही उतरले : चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. १३ एप्रिलला ७२ हजार ८०० किलो चांदीचा दर होता. सोमवारचा दर ६८ हजार ८०० होता. मुहूर्तावरील खरेदीसाठी चांदीच्या अनेक वस्तूही सराफ बाजारात उपलब्ध आहेत.
मुहूर्तावर खरेदी म्हणजे ग्राहकांचा प्रचंड उत्साह
मुहूर्तावर येणारा ग्राहक हा उत्साहीच असतो. लग्नसराईची खरेदीही मुहूर्तावरच होते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण असल्याने ग्राहक आपसुकच अक्षय्य तृतीयेला खरेदीसाठी बाहेर पडणार. त्यामुळे सराफ बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.''
प्रदीप भोळा, सराफ व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.