आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालघर जिल्ह्यातील एका तरुणाच्या नावे कर्जत, डहाणू चिंचलखैरे येथील आदिवासी परिसरातील जमीन खरेदी केली. त्या कागदपत्राच्या आधारे सोलापुरातील जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी बँकेकडून परस्पर एक कोटी दहालाखाचे कर्ज घेतले. बनावट विड्राॅल स्लिपच्या आधारे पैसे काढले. त्याची परतफेड करण्यासाठी तरुणावर दडपण आणले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अमर विजय जाधव (सीवूड इस्टेट, नेरूळ, नवी मुंबई), यशवंत वसंतराव पाटील (अलिदादा इस्टेट कुलाॅ), राजेंद्र पुंडलिक हजारे या तिघांवर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार २०१४ पासून ते ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जनकल्याण मल्टीस्टेट सोसायटी, को ऑप. क्रेडिट सोसायटी शाखेत घडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.