आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पाऊस:मंद्रूप शिवारात उडीद पाण्यात

दक्षिण सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंद्रूपसह परिसरातील गावांना बुधवारी दुपारी जोरदार पाऊसाने झोडपले. मंद्रूपमध्ये अडीच ते साडेतीनच्या दरम्यान विजांचा गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. मंद्रुपसह निंबर्गी, भंडारकवठे, विंचूर, कुसुर, अंत्रोळी, गुंजेगाव, अकोले, कंदलगाव, येळेगाव, वांगी, हत्तुर, औराद, टाकळी, बरुर या परिसरात चांगला पाऊस झाला. याशिवाय तालुक्यातील इतर भागातील कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे मंद्रूप गावातील रस्त्यावर दलदल झाली आहे. ग्रामस्थांना चालणे हे मुश्किल झाले आहे.

गेले तीन चार दिवसापासून सतत पाऊस पडतो आहे. काढणीला आलेल्या उडीद, तूर व इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारच्या पावसामुळेच अनेकांचे उडीद पाण्यात गेले. खरीप पिकाच्या नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...