आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादागिने घडवण्यासाठी सराफाने दिलेले सुमारे ३२ तोळे सोने घेऊन कारागिरीने धूम ठोकली. त्याचा माग घेत पोलिस मेरठमध्ये पोहोचले. तिथे सहा दिवस तळ देत शतिाफीने त्याला पकडण्यात आले. सोशल मीडिया, सायबर खात्याकडील माहतिीच्या आधारे त्याच्या मोबाइल फोनवर पाळत ठेवून त्याला गाठण्यात आले. त्याच्याकडून साडेबारा तोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
सायबरच्या माध्यमातून पाळत काझीच्या शोधासाठी पोलिसांनी तांत्रिक यंत्रांचा आधार घेतला. त्यावरून तो मेरठला असल्याचे कळाले. पोलिस पथक मेरठला पोहोचले. सहा दिवस मुक्काम करावा लागला. तो वेगवेगळ्या नंबरने त्याच्या जवळच्या लोकांना व्हाइस कॉल करत होता. तो धागा पकडत पोलिसांनी त्याचे ठिकाण शोधले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सोने त्याच्या काकाच्या घरी ठेवल्याचे सांगतिले. पोलिसांनी तेथे जाऊन १२५ ग्रॅम सोने जप्त केले. ही माहतिी सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
सरफराज सलाउद्दीन काझी (रा. पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यात सामील असलेला त्याचा भाऊ एजाज काझी व चुलत भाऊ अरसुद्दीन काझी यांनाही पोलिसांनी अटक केली. मे २०२२ मध्ये याचा गुन्हा दाखल झाला होता. आसिफ बशीर शेख (वय ३७, रा. हाजी हजरत खान चाळ) यांनी फिर्याद दिली होती. त्यांनी दागिने बनवण्यासाठी काझीला २१३ ग्रॅम सोने दिले. तसेच इतर दोन सराफांनीही १०५ ग्रॅम सोने दिले होते. मात्र त्याने दागिने न घडवता हे सर्व सोने घेऊन पळून गेला. ही कारवाई जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. व्हट्टे, एन. एम. स्वामी, जी. एस. क्षीरसागर, जमादार, लिगाडे, प्रकाश गायकवाड, प्रवीण शेळकंदे, वसीम शेख, अयाज बागलकोटे यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.