आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बारा ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर माजी आमदार दिलीप माने समर्थकांनी विजय मिळवला. मार्डीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने तर कौठाळी व डोणगाव ग्रामपंचायतीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली. गावडी दारफळ येथे सत्तांतर करत राष्ट्रवादीने ग्रामपंचायत ताब्यात घेतली. गेल्या पाच वर्षांत विविध पुरस्कार मिळवत राज्य पातळीवर चमकलेल्या कारंबा गावचा निकाल मात्र धक्कादायक लागला. येथील भाजपचे विनायक सुतार यांच्यासह एक महिला ग्रामपंचायत सदस्य वगळता सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले.
डोणगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपच्या राजश्री आमले यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. मात्र येथे भाजपच्या नऊ सदस्य उमेदवारांना हार पत्करावी लागली, सरपंच संजय भोसले यांचाही पराभव झाला. रानमसले ग्रामपंचायतमध्येही सरपंचपदी दिलीप माने गटाचे मनोहर क्षीरसागर विजयी झाले. येथे सदस्याच्या सहा जाागंवर राष्ट्रवादीने विजय मिळवला.
पाकणीत तिघांत टाय, चिठ्ठीतून निवड पाकणी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये शालन गुंड, अंजली डेंगळे व परिणीता शिंदे या तिन्ही उमेदवारांना १४९ मते मिळाली या मध्ये शिंदे यांचा चिठ्ठीद्वारे विजय झाला.
पॅनल प्रमुखाचा चिट्टीने झाला पराभव कौठाळी येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये अशोक जाधव व समाधान भक्ते यांना समान मते पडली. चिठ्ठीद्वारे जाधव विजय ठरले. तर प्रभाग क्रमांकतीन मध्ये भाजपचे गट प्रमुख संग्राम पाटील व विरोधी राष्ट्रवादी गटाचे गटप्रमुख शरद माने यांना समान मते मिळाली. चिठ्ठीने शरद माने यांना साथ दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.