आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी निरोप समारंभ:यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेशिवाय संस्कार, बौद्धिक ज्ञानाला महत्त्व हवे

सोलापुर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उमाबाई श्राविका शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेला दिले साहित्य भेट

सोलापूर यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितके महत्त्व देता तितकेच महत्त्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिले पाहिजे. शाळेने तुम्हाला कोरोना काळात जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे. ती शिदोरीचा तुम्ही उपयोग करून जीवनात यश प्राप्त केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वत:चे तसेच शाळेचे नाव व आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे मुख्याध्यापक राजकुमार भोरे यांनी केले.भवानी पेठ येथील वीरतपस्वी प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भोरे बोलत होते. या वेळी नंदकुमार धाये, सिद्रामप्पा उपासे उपस्थित होते. प्रथम वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी व योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व गुरुजनांचा लेखणी देऊन सत्कार केला. राजश्री कटके, सृष्टी विभूते, प्रतीक्षा खोबरे, रचना कोळी, अमृता स्वामी यांनी भाषण करीत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नेताजी प्रशाला
निलम श्रमजीवीनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले होते. व्यासपीठावर सुभाष धुमशेट्टी, गौरीशंकर आळंगे, राजकुमार मुलगे व गणपती पाटील उपस्थित होते. प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीक्षा शिंदे, श्रुतिका सगम, स्वाती रचा, आरती पवार व जल बोरामणी या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेचे ऋण व्यक्त केले. या वेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन कोमल कुंभार यांनी केले. रम्या नक्का यांनी आभार मानले.

श्राविका विद्यालय
उमाबाई श्राविका विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणून प्रशालेत प्रिंटर, माइक व १०० खुर्च्या व क्रीडा साहित्य बॅट बॅडमिंटन रॅकेट भेट दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा होते. या वेळी सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे, मुख्याध्यापक मोहोळे, उपमुख्याध्यापक अश्विनी पंडित, बाळासाहेब पौळ उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अनुप कस्तुरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अनिता पाटील व केतकी सोनटक्के यांनी केले. सुहास छंचुरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसप्पा कुंभार, हरी ऐवळे, सुनंदा भालेराव, विद्या कासार यांनी परिश्रम घेतले.

बत्तुल विद्यालय
आदर्श माता व्यंकम्माबाई बत्तुल विद्यालयात दहावीच्या मुलांना नववीच्या मुलांनी निरोप दिला. सर्व कार्यक्रमाची तयारी नववीच्या मुलांनी केली असून, अल्पोपहारची सोय केली होती. शाळेला भेटवस्तू देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक प्रमोद बत्तुल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आस्मा शेख हिने केले. अभार रुक्सार शेख हिने मानले.

वि. मो. मेहता प्रशाला
कै. वि. मो. मेहता प्रशालेत इ. १० वीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मेहनत, परिश्रम घेऊन सर्वश्रेष्ठ यश संपादन करा, असा एका प्रेरक कथेच्या माध्यमातून संदेश दिला. सहशिक्षिका नंदिनी देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेकडून अल्पोपहार देण्यात आला. सूत्रसंचालन सहशिक्षिका शितल कोर्टीकर यांनी तर आभार चंद्रकांत आदलिंगे यांनी मानले. या वेळी पर्यवेक्षिका सुस्मिता तडकासे, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...