आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात 50 हजार घरात नळच नाही:नोटीससाठी महापालिका अ‍ॅक्शनमोडमध्ये; घर तेथे नळ योजना राबवणार- आयुक्त पी. शिवशंकर

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वॉटर ऑडीट सुरु असून, एकूण 2.10 लाख मिळकतीपैकी 1.97 मिळकतीचे ऑडीट करण्यात आले. सुमारे 60 हजार मिळकतीत पालिकेचे नळ नसल्याचे निदर्शनास आले. यापैकी अंदाजे 10 हजार मिळकतदार सार्वजनिक नळावर पाणी भरत असले तरी 50 हजार मिळकतदारांकडे नळच नसल्याचे निदर्शनास आले. त्यांना नोटीस देण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

शहरात घर तेथे नळजोड ही मोहिम राबवण्यात येणार आहे. जे मिळकतदार बाजूच्या घरातून पाणी घेतील त्या दोन्ही मिळकतदारांना दुप्पट पाणीपट्टी आकारण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने, ते कमी करण्यासाठी पाण्याचे ऑडीट करण्यात येत आहे. प्रत्येक घरात जाऊन चौकशी करण्यात येत आहे. त्या कामाचा आढावा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्थायी समिती सभागृहात घेतली. शहरात 2.10 लाख मिळकती असून, 1.97 लाख मिळकतीचे पाण्याचे ऑडीट करण्यात आले. सुमारे 60 हजार मिळकतमध्ये नळ नाहीत. त्यापैकी 50 हजार घरात नळच नाही असे दिसून आले. त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. त्यांनी तत्काळ पालिका झोन कार्यालयात अर्ज करुन नळ घ्यावे. अन्यथा नोटीस देण्यात येणार आहे. बाजूच्या घरातून पाणी घेत असल्याचे निदर्शनास आल्यास दोन्ही मिळकतदारांना दुप्पट पाणीपट्टी बिले देण्यात येईल.

सार्वजनिक नळ बंद करणार

शहरातील सार्वजनिक नळाची निकट लक्षात घेता सर्व्हे करण्यात येणार आहे. गरज नसेल तेथील सार्वजनिक नळ बंद करण्यात येणार आहे. हळूहळू शहरातील सार्वजनिक नळ पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

बिले वाटप केल्यानंतर पुरवणी बिल देणार

पालिकेच्या वतीने सन 2022-23 चे मिळकतकर बिले छपाई सुरु असून, त्यानंतर अनाधिकृत नळ मिळून आल्यास त्यांना पुरवणी बिल देण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

शहरातील बोगसगिरी सापडेल

शहरातील घरगुती व वाणिज्य वीज मीटर यांची आकडेवारी वीज मंडळाकडून घेऊन मेळ घोतल्यास शहरातील बोगस मिळकती व नळ जोड मिळून येईल. यानुसार महापालिकेने कामकाज सुरु केले आहे.

बातम्या आणखी आहेत...