आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ In Parentheses Is The Previous Year | Marathi News

मागच्या वर्षी इतकाच पाऊस:​​​​​​​तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये कंसात मागील वर्षीचा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासन दरबारी पावसाळा संपल्याची ३० सप्टेंबरला नोंद झाली असून, चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरीच्या ११० टक्के म्हणजेच ५३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी ५३४ तर यंदा जिल्ह्यात ५३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. करमाळा तालुक्यात सर्वाधिक १४६ टक्के (६७५ मि.मी.) तर सर्वात कमी सांगोला तालुक्यात ७४.८० टक्के (३५२ मि.मी.) पाऊस झाला आहे. यंदा जिल्ह्यात करमाळा व बार्शी तालुक्यातील मंडळामध्ये २५० मि.मी. हून अधिक नोंद झाली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात मार्डी मंडळात २१३ मि.मी., दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी मंडळात २७६ मि.मी., बार्शी तालुक्यातील बार्शी मंडळात ३९५ मि.मी., अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव मंडळात २१४ मि.मी., मोहोळ तालुक्यातील नरखेड मंडळात २५७ मि.मी., माढा तालुक्यातील माढा मंडळात २२८ मि.मी., करमाळा तालुक्यातील जेऊर व उमरड मंडळात ३९५ मि.मी., पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव मंडळात २४३ मि.मी., सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडळात ३१२ मि.मी., माळशिरस तालुक्यात दहिगाव मंडळात २२५ मि.मी. तर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव मंडळात २७८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...