आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळ उत्पादनात अग्रेसर:साेलापुरात सकाळीच ठरतात डाळींचे दर; त्यानंतर देशभर

साेलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापुरात सकाळी साडेआठलाच डाळीचे दर ठरतात. त्यानंतर त्याच दराचा वेध घेत देशभरातील दर निश्चित हाेतात. यापूर्वी डाळ उत्पादनात अग्रेसर लातूरमध्ये दर ठरत हाेते. आता साेलापूरच्या उत्पादकांपुढे लातूरची डाळ शिजत नाही. त्यामुळे लातुरातील बरेच उत्पादक साेलापूरच्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहेत. काही आलेही. त्यांना हैदराबाद रस्त्यावरच जागा हवीय. तिथे मिनी एमआयडीसी विकसित केल्यास साेलापूर डाळी उत्पादनात अग्रेसर हाेऊ शकेल.

हैदराबाद रस्त्यावरील वेअर हाऊस आणि दाळ मिल चालवणारे महेश सिंदगी यांनी बहुतांश साेलापूकरांना माहीत नसलेल्या या गाेष्टी सांगितल्या. रविवारी सकाळी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात झालेल्या टाॅक शाेमध्ये त्यांनी डाळ उत्पादन आणि त्याचे भविष्य या गाेष्टी मांडल्या. शेजारच्या कर्नाटकातील विजयपूर आणि कलबुर्गी येथून शेतमाल येताे. ताे चांगल्या प्रतीचा आहे.

त्यावर प्रक्रिया करण्यासाठी साेलापुरात ५० डाळ मिल आहेत. दर्जेदार डाळींचे उत्पादन वाढल्याने राज्याबाहेरही मागणी वाढली. अगदी छत्तीसगडपर्यंत साेलापुरातल्या डाळी जातात. त्याने साेलापूरकडे बघण्याचा दृष्टिकाेनच आता बदलला. साेलापुरात सकाळीच जाहीर झालेल्या दराकडे आता देशभरातील उत्पादकांचे लक्ष असते, याकडेही श्री. सिंदगी यांनी लक्ष वेधले. बार्शीतील उत्पादन घटले. शहरातील हैदराबाद रस्ता, चिंचाेळी एमआयडीसी आणि मुळेगाव या भागात उत्पादकांची संख्या वाढली, असेही श्री. सिंदगी म्हणाले.

हैदराबाद रस्त्यावर आैद्याेगिक वसाहत विकसित केल्यास....
लातूर येथील डाळ उत्पादक साेलापूरला येतील. यामुळे सोलापुरात राेजगार वाढेल.
तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना पुरवठा करणेही साेयीचे हाेईल.
डाळ उत्पादनावर आधारित ज्यूट, पीपी बॅगचे उत्पादकही सोलापुरात येतील.
डाळ उत्पादकांना सामूहिक सुविधा देणारे क्लस्टर निर्माण हाेतील.

पुरेशी वीज मिळत नाही
चिंचाेळी आैद्याेगिक वसाहतीत २५ आणि हैदराबाद रस्त्यावर २५ अशा एकूण ५० डाळ मिल साेलापुरात आहेत. परंतु त्यांना पुरेशी वीज मिळत नाही. २४ तास उत्पादन घेण्यात खंड पडताे. त्याचा परिणाम थेट पुरवठा आणि राेजगारावर हाेताे. याबाबत ११ केव्हीची स्वतंत्र विद्युत वाहिनी (फीडर) देण्याची मागणी केली. त्याचा पाठपुुरावाही सुरू आहे.''- महेश सिंदगी, दाळ मिलचालक

बातम्या आणखी आहेत...