आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन डे चे आयोजन:श्राविकात शिक्षकांनी वाचला विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमाबाई श्राविका विद्यालयामध्ये ओपन डे चे आयोजन केले होते, त्यास पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रथम सत्र परीक्षेचे निकाल वाटप तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख पालकांपर्यंत पोहोचवण्यात आला. विद्यालयामध्ये मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, बाळासाहेब पौळ, दीप्ती रोमन यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन डे व पालक सभेचे आयोजन केले होते. इयत्ता पाचवी ते दहावीतील ११६७ विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांच्या पालक उपस्थित होते.

पालकांचे प्रशालेतर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले. प्रत्येक वर्गातील वर्गशिक्षकांनी प्रथम पाच क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे आकर्षक बक्षिसे देऊन हार्दिक अभिनंदन केले. प्रत्येक विद्यार्थ्याचे सर्व विषयांचे पेपर व प्रगती पत्रक पालकांना दाखवून प्रशालेतील विविध सहशालेय उपक्रमांची कल्पना दिली. या ओपन डेच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशालेचे कला शिक्षक प्रवीण कंदले यांनी सुंदर फलक लेखनाने आलेल्या सर्व पालकांचे लक्ष वेधून घेतले.

बातम्या आणखी आहेत...