आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात गणेशोत्सावावेळी वाद:विसर्जन पद्धती आणि डॉल्बीला परवानगी न दिल्याने भाविक नाराज

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जना दिवशी होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेने सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जन करण्यासाठी महापालिकेने विविध 12 ठिकाणी कृत्रिम कुंड आणि 84 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत. या ठिकाणी कृत्रिम कुंडामध्ये केवळ मूर्ती तीन वेळा बुडवून ती परत आणून कट्ट्यावर ठेवण्यात येत आहे. दरम्यान या निर्णयाला सोलापुरात हिंदू जनजागृती समितीने विरोध केला असून विजापूर रोडवरील संभाजी तलावाच्या कृत्रिम कुंडाच्या ठिकाणी निषेधार्थ फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार मूर्ती विसर्जन करण्यापासून रोखणे हा हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचा प्रकार, पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सणांना विरोध करण्याचे षडयंत्र, कारखान्याद्वारे होणाऱ्या जलप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून निर्माल्य विसर्जनास विरोध हा केवळ हिंदू द्वेष असे फलक घेऊन संघटनेचे स्वयंसेवक थांबले आहेत. दरम्यान, महापालिकेने जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप दत्तात्रय पिसे यांनी यावेळी केला.

डॉल्बीच्या परवानगीवरुन नाराजी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मोहरम या सणासाठी डॉल्बीला परवानगी मिळते तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला का नाही असा सवाल मंडळाकडून करण्यात आला

बातम्या आणखी आहेत...