आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात लोकशाही टिकवण्यासाठी:राष्ट्रपती बौद्ध हवेत; पॅंथर सेनेची सोलापुरात मागणी

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसंमतीने देशाचा राष्ट्रपती बौद्ध करा. मगच भारतात शांतता, सर्वधर्मसमभाव, संविधान, मानवता, लोकशाही टिकेल अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. नुपtर शर्मा, नवीन जिंदाल यांना अतिरेकी जाहीर करून जेलमध्ये टाकावे, अशी मागणीही करण्यात आली.

केदार म्हणाले, नुपूर शर्मा, जिंदाल यांच्यामुळे विविध देशातील भारतीय धोक्यात आले आहेत. संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी धार्मिक उद्रेक निर्माण करून टोकाचा संघर्ष पेटवला जातो हे चुकीचे आहे. हनुमान चालिसा, सिद्धलिंग, मोहम्मद पैगंबर अवमान हे सगळे मुद्दे संविधानाला संपवण्यासाठी सुरू आहेत. बुलडोजर आंदोलन, जोग्या घालणे मानविधिकाराची हत्या असल्याचे ते म्हणाले.

आंदोलन छेडणार

केदार म्हणाले, दलित अत्याचार राष्ट्रीय आपत्ती आहे. ७५ वर्षांनंतरही आम्हाला माणूस म्हणून जगू दिले जात नाही. राज्यात आणि देशात याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. भीमा कोरेगाव दंगलीतील ३५००० तरुणांवर गुन्हे मागे घ्यावेत. बौद्ध लेणी आणि वरील अतिक्रमण हटवावे. दलित अत्याचार यावर ठोस भूमिका घ्यावी यासाठी लवकरच आपण राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

सोलापूरचे पाणी पळवले

केदार म्हणाले, पालकमंत्री म्हणून भरणे यांनी आपली भूमिका नीट ठेवली नाही. त्यांनी सोलापूरचे पाणी पळविले ही बाब निंदनीय आहे. पालक मंत्री एका जिल्ह्याचा असतो. तो एका तालुक्‍याचा होतो तेव्हा त्याला पालकमंत्री कसे म्हणता येईल. बापाला सगळी लेकरे सारखी असली पाहिजेत. सोलापूरच्या हक्काचे पाणी सोलापूरला दिले गेले पाहिजे. कोणावर अन्याय नको. आजच्या सरकारची अवस्था मी माझा असे झाली आहे, अशी सडकून टीका केदार यांनी केली. यावेळी महेंद्र शिरसट, तानाजी शिवशरण, रत्नदीप गायकवाड, राजन शिरसट हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...