आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘सोलापूर शहर व जिल्ह्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. वैयक्तिक हितासाठी सिद्धेश्वर कारखान्याला त्रास दिला जात आहे. एका बाजूला ऊस मिळण्यासाठी अन् दुसऱ्या बाजूला जुन्या वादास राजकीय मुद्दा करून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वादामुळे सर्वसामान्य सोलापूरकर, शेतकऱ्यांचा विचार न करता द्वेषाचे आणि चुकीचे राजकारण सुरू अाहे. त्यामुळे येथील भाजप खासदार व आमदारांच्या मतदारसंघात आगामी निवडणुकांमध्ये परिवर्तन निश्चित होईल’, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
श्री. पवार दिव्य मराठीच्या फुड फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.श्री. पवार म्हणाले, “सिद्धेश्वर कारखान्याच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते. येथील शेतकरी, सोलापूरकरांच्या हितासाठी कारखान्याला पर्याय नाही. पण, विमानतळासाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे. कारखान्याची बाजू सत्याची असल्याने आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. शहराच्या विकासासाठी विमानसेवेची गरज आहे.
त्यासाठी बोरामणीचा विमानतळाचा पर्याय असून ते विमानतळ सुरू होणे आवश्यक आहे. माळढोक, अभयारण्यामुळे येणारी अडचण सोडवण्यासाठी येथील खासदारांनी केंद्र शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. माझ्या मतदारसंघातही माळढोकचा प्रश्न आहे. पण, तो प्रश्न आम्ही सोडवला आहे. माझ्या मतदारसंघाताली प्रश्न सुटून शकतो. मग, सोलापूरातील प्रश्न न सुटण्यास येथील सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यांच्याकडून काहीच ठोस प्रयत्न होत नसून, त्यांची निष्क्रियता असल्यामुळे प्रश्न रखडला.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.