आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत केंद्र शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत दुष्कर्म, अत्याचार पीडितांना आर्थिक सहाय्य दिले जाते. चार वर्षांमध्ये २४४ अर्ज होते. त्यानुसार दोन कोटी ५० लाख ६५ हजार रुपये मंजूर झाले. त्यापैकी आतापर्यंत ४८ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे अनुदान पीडितांना वितरित करण्यात आले आहे. दुष्कर्म, अत्याचार पीडितांना आर्थिक सहाय्य दिले जाते. २०१८ ते जून २०२२ या कालावधीमध्ये २४४ अर्ज दाखल आले होते. त्यापैकी ४८ लाख ६२ हजार रुपये वितरित केले आहेत, जिल्हा विधी प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
८९८ व्यक्तींसाठी वकील नेमले
गरीब, गरजू, पीडितांना जिल्हा विधी सेवाकडून मोफत वकील दिला जातो
२०१८ -२१ दरम्यान ८९८ लोकांना मोफत वकील देण्यात आले आहेत.
अस्थिव्यंग बाळ; गर्भपातासाठी मदत
महिलेच्या गर्भात तीन ते पाच महिन्यांपर्यंत अस्थिव्यंग बाळ वाढत असेल, गर्भपातासाठी कायदेशीर मदतीसाठी प्राधिकरण देते.
वेळ, श्रम, पैसा याची बचत
ल़ोकअदालत तडजोडीने वाद निराकरणासाठी माध्यम आहे. यात वेळ, श्रम, पैसा याची बचत होते. पक्षकार, वकील यांनी यात सहभागी व्हावेत.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश शब्बीर अहमद औटी, अध्यक्ष, विधी सेवा प्राधिकरण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.