आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक:लोकअदालतीमध्ये सामोपचाराने तिघांचा संसार पुन्हा फुलला; पती-पत्नीचे वाद पोहोचले होते न्यायालयात

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीचे वाद न्यायालयापर्यंत पोहोचले होते. घटस्फोटासाठी अर्जही केले होते. अनेक महिन्यांपासून वेगळे राहत होते. मुलांची ताटातूट, पती पत्नीच्या नात्यात अंतर पडले होते. असे असतानाही न्यायालयात सामोपचाराने तिघा कुटुंबीयांचे संसार पुन्हा सामोपचाराने मिटले आहेत. त्यांच्या संसारात आनंद चैतन्य भरण्याचे काम शनिवारी लोकअदालतमध्ये ‌झाले.

संदीप व दीपाली (या दोघांची नावे बदलली आहेत) २०१५ साली विवाह झाला होता. घरगुती कारणावरून वाद विकोपाला गेला. घटस्फोटासाठी अर्जही केला होता. दुसऱ्या घटनेत अमित व संजना (दोघांची नावे बदललेली आहेत) त्यांचा विवाह १८ मे २००३ रोजी झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. वाद विकोपाला गेल्यानंतर दावा दाखल केला होता. तिसऱ्या घटनेत साक्षी आणि प्रशांत (नावे बदलली आहेत) २०१५ साली विवाह झाला होता.

त्यांच्यातही किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. चार-पाच वर्षांपासून दोघे विभक्त राहतात. त्यांनीही दावा दाखल केला होता. या तिघांचेही संसार जुळवण्यात पुन्हा यश आले आहे. ‌ तीनही जोडप्यांचे प्रमुख न्यायाधीश देशपांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...